International Women’s Day : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार  : ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा

Homeपुणेsocial

International Women’s Day : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार  : ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा

Ganesh Kumar Mule Mar 08, 2022 12:40 PM

National Sports Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
Marathi Bhasha Gaurav Din | युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे | प्रा डॉ. वसंत गावडे
Annasaheb Waghire College : स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत : रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार 

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार

: ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा

पुणे : “प्रत्येक घरातील महिला ही लक्ष्मी, विद्या व अन्नपूर्णा आहे. स्त्री ही भावनिक असते, ती आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. स्त्रियांनी आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे, रूढी परंपरांचे बंधन तोडून आधुनिक जीवनाची कास महिलांनी धरावी, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तोच खरा महिला दिन ठरेल”. असे प्रतिपादन डॉ प्राची सुतार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये ८ मार्च ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून ऍड.पूनम डेरे, डॉ. प्राची सुतार, पी.एस.आय. रागिणी कराळे तसेच महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ. ढाकणे, डॉ. के. डी. सोनावणे, ज्येष्ठ प्रा डॉ बी एम शिंदे डॉ व्ही वाय गावडे डॉ एन एन उगले डॉ आर टी काशीद उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एम शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी महिला दिनाचे महत्व विशद करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

महिला दिनाचे औचित्य राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये दोन वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवीका मीरा नायकोडी, पृथ्वी भोर, शुभदा गायकर, अंकिता शिरसाठ, सृष्टी महाकाळ, मनोज गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ऍड. पूनम डेरे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “स्त्री ही सक्षमतेचे व मांगल्याचे प्रतीक आहे. तसेच महिला कल्याणासाठी असलेल्या प्रमुख १८ कायदे प्रत्येक महिलेला माहिती असणे गरजेचे आहे असे नमूद केले व कोविड १९ च्या काळात स्त्रियांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरी चाही त्यांनी उल्लेख केला.

याच बरोबर जुन्नर तालुका निर्भया पथकाचा प्रमुख पीएसआय रागिणी कराळे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरण व महाविद्यालय युवतींनी शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यावे तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता तिचा धैर्याने सामना करावा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले.

उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे म्हणाले “केवळ महिला दिनीच नव्हे महिलांना कायमच सन्मानाने जगण्याचे वातावरण निर्माण करून देणे ही समस्त पुरुष वर्गाची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.

तसेच या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, कनिष्ठ विभागातील आंद्रे मॅडम व वरिष्ठ विभागातील प्रा. रोहिणी मदने मॅडम यांनीही आपले विचार व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही. एम. शिंदे म्हणाले “इतिहास काळात महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती, जिजाऊंनी शिवराय घडविले व शिवरायांनी जीवनभर महिलांचा सन्मान केला, तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच आज महिला नोकरी करून आपले घर चालवीत आहे, प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कार्यक्षेमतेने प्रभाव टाकत आहे. पुरुषी अहंकार बाजूला ठेऊन महिलांना सन्मानाची वागणूक प्रत्येक पुरुषाने दिली पाहिले असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे,डॉ निलेश काळे, डॉ भुषण वायकर, प्रा अजय कवडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री मिलिंद ढगे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ भूषण वायकर यांनी व्यक्त केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0