ESIC | अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ESIC चे लाभ लागू करावेत

HomeBreaking News

ESIC | अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ESIC चे लाभ लागू करावेत

Ganesh Kumar Mule Jul 17, 2025 9:34 PM

Pink E Rickshaw | आम्ही शासनाच्या लाडक्या बहिणी नाहीत का? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल
Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ladki Bhahin Yojana |आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण कधी होणार? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

ESIC | अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ESIC चे लाभ लागू करावेत

 

Sunil Shinde – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिलांना कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत मोफत आरोग्य सुविधा, अपघात विमा, मातृत्व लाभ, निवृत्ती नंतरचा सुरक्षा लाभ व अन्य कामगार हक्काचे संरक्षण त्वरित लागू करावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय मजदूर संघ या संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (Pune News)

राष्ट्रीय मजदूर संघ युनियनने याबाबत मुख्यमंत्री यांना अधिकृत पत्र देऊन स्पष्टपणे नमूद केले आहे की. या महिला गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत अल्प मानधनावर राज्य शासनाच्या अंगणवाडी केंद्रात कार्यरत असून त्यांच्याकडे लहान मुलांचे पोषण, महिलांचे आरोग्य, आणि विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आहे.

मात्र, या महिलांना कोणतीही आरोग्य सुविधा किंवा विमा सुरक्षा आजतागायत देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांच्या आरोग्य व कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) या केंद्र सरकारच्या योजनेल या महिला कर्मचारी वर्गाचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणताही निधी खर्च करावा लागत नाही किंवा केंद्र सरकारलाही कोणताही निधी खर्च करावा लागत नाही. कामगार राज्य विमा महामंडळामध्ये मालक व कामगार या दोघांच्याकडूनही निधी जमा केला जातो व तो निधी सध्या या मंडळाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस या शासकीय कामगार या श्रेणीत मोडतात आणि त्यांना संपूर्ण कामगार हक्क देणे बंधनकारक आहे.

ESIC अंतर्गत मिळणाऱ्या लाभांची यादी:

1) मोफत आरोग्य तपासणी व उपचार

2) अपघात विमा व अपंगत्व सवलती

3) मातृत्व काळातील आर्थिक मदत

4) निवृत्तीनंतर सुरक्षा योजना

5) औषधोपचार व कुटुंब सहाय्य

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मजदूर संघाने मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रा‌द्वारे राज्य सरकारने तातडीने या महिला कामगारांसाठी ESIC लागू करून सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी केली आहे.

कामगार नेते सुनील शिंदे हे पुढे म्हणाले की की इ एस आय सी मध्ये अंगणवाडी सेविका घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे त्यामुळे. सरकारने याकडे त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घ्यावा व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ईएसआयसी अंतर्गत समावेश करावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: