Local body Elections | पालिका निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाचे नवीन आदेश | जाणून घ्या सविस्तर

HomeBreaking Newssocial

Local body Elections | पालिका निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाचे नवीन आदेश | जाणून घ्या सविस्तर

Ganesh Kumar Mule Apr 27, 2023 2:59 AM

Local body election| पालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
Local Body Election | पालिका निवडणुकींच्या बाबतीत शिंदे – फडणवीस सरकारचा पळपुटेपणा पुन्हा एकदा उघड | राष्ट्रवादीचा आरोप
New Bill : आताची प्रभाग रचना रद्द!  : निवडणुका 5-6 महिने पुढे जाणार? : महापालिकेला अजून सूचना नाहीत 

पालिका निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाचे नवीन आदेश | जाणून घ्या सविस्तर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (local body elections) अर्थात पालिका निवडणुका  नि:पक्ष, शांत, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त करताना काही दक्षता घेणे आवश्यक आहे याची खात्री झाली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

| असे आहेत आदेश

१) महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिकारी / कर्मचारी यांची मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात येऊ नये. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा नेमणुका करावयाच्या झाल्यास त्यांना मतदान केंद्राध्यक्ष व पहिला मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येऊ नये.

२) महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांकरिता मतदान केंद्रावर कर्मचारीवृंदांची नियुक्ती करताना त्यांचे कार्यालयाचे ठिकाण व निवासाचे ठिकाण ज्या निवडणूक प्रभागात येते, त्या प्रभागातील मतदान केंद्रावर त्यांची नियुक्ती करता येणार नाही. याकरिता कर्मचारीवृंद अधिग्रहित करताना त्यांचा ऑफिसचा पत्ता, घरचा पत्ता, मोबाईल नंबर, वेतनश्रेणी, निवृत्तीचा दिनांक याबाबतची माहिती घ्यावी, जेणेकरुन मतदान केंद्रासाठी पथक निर्मिती करताना अडचण येणार नाही.
३) मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पथकात एकाच कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश नसावा. पथक नियुक्त करतानाच त्यातील अधिकारी / कर्मचारी वेगवेगळ्या कार्यालयातील असतील, याची दक्षता घ्यावी.
४) महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांकरिता मतदान केंद्रावर कर्मचारीवृंदांची नियुक्ती केल्यानंतर त्या प्रभागात निवडणूक लढविणारा उमेदवार अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या आदे
अधिकारी / कर्मचाऱ्याचा नातेवाईक (यात उमेदवाराचे पति/पत्नी, आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी, मामा, मामी, मावशी, आत्या, बहिण (सख्खी व चुलत भाऊ (सख्खा व चुलत), मुलगा, मुलगी, भाचा, भाची, पुतण्या, पुतणी या नात्यांचा समावेश राहील.) किंवा हितसंबंध असलेली व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यास त्या अधिकारी / कर्मचाऱ्याची त्या प्रभागातील नियुक्ती रद्द करुन आवश्यकतेनुसार अन्य प्रभागातील मतदान केंद्रावर त्याची नियुक्ती करण्यात यावी.
(state election commission guidelines for recruiting officers on polling booth)