eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश 

HomeपुणेBreaking News

eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश 

कारभारी वृत्तसेवा Dec 15, 2023 2:17 PM

PMC Employees Promotion | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक पदावर केल्या नियुक्त्या
Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले
Compensation | मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी | शेतकऱ्यांना दिलासा

eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

eFile | PMC Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी सर्व खात्यांना दिले आहेत. (PMC Pune News)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय कामकाजात संगणकाचा  अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित व माहिती त्वरेने व जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रीया सुलभ व्हावी यासाठी सर्व शासकीय विभागामध्ये शासकीय कामकाजात ई- ऑफीस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महापालिकेत ई-ऑफिस संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित मास्टर ट्रेनर यांचेमार्फत सर्व विभागांकडील नोडल ऑफिसर यांना संगणकप्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

त्यानुसार सर्व  विभागाकडे संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता प्रत्येक विभागाकडील संबंधित अधिकाऱ्यांची यादी निश्चित करण्यात यावी व त्यानुसार संगणक प्रणाली  वापराकरिता आवश्यक युजर बनविणेसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागातील मास्टर ट्रेनर यांचेशी संपर्क करण्यात यावा. तसेच प्रत्येक  विभागाकडील नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर यांचेमार्फत ई-ऑफिस मंगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता नियुक्त मास्टर ट्रेनर यांचेशी संपर्क साधून प्रत्येक विभागाकडील कार्यवाही करण्यात यावी. त्यानुसार सर्व खात्यांमध्ये ई-ऑफिस संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेचे कामकाज त्वरित सुरु करावे. असे आदेश विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)