मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आमदार, खासदारांची कामे होत नाहीत
: आमदार, खासदारांनी व्यक्त केली नाराजी
: प्रमाणपत्र देण्यास विलंब
पुणे जिल्ह्यातील संसद सदस्य आणि विधानमंडळ सदस्यांना त्यांचे क्षेत्रातील स्थानिक गरजा व पायाभूत सुविधा यांची आवश्यकता विचारात घेऊन लोकउपयोगी कामे सुचविता येण्याकरिता खासदार आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम या शासकीय योजना जिल्हा नियोजन समितीद्वारे राबविल्या जातात. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे(DPDC) सदस्यांनी प्रस्तावित केलेल्या कामाकरिता विविध कार्यान्वयीन यंत्रणेस अंदाजपत्रक सादर करणेबाबत कळवण्यात येते. या कामाकरीताचे आवश्यक असणारे विविध प्रमाणपत्र(Certificates) महानगरपालिकेकडुन/संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून मिळणेकरीता विलंब होतो. या कारणांमुळे संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेकडून अंदाजपत्रक विलंबाने सादर केले जातात. परिणामी सदस्यांचा प्राप्त निधी वेळेत खर्च होत नसून सर्व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त(Municipal Commissioner), व अति. महा. आयुक्त (ज) यांजकडे संदर्भाकित अर्ध शासकीय पत्राद्वारे कळविले आहे. ही बाब गंभीर असून याबाबत वेळीच पूर्तता होणे आवश्यक आहे. तरी या पुढे खासदार आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांकरिता (कार्यान्वयीन यंत्रणा पुणे महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असल्यास) पुणे महानगरपालिकेकडून वेळीच आवश्यक ते सर्व कागदपत्र पाठविणे बाबत संबंधिताना आदेश द्यावेत. असे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
COMMENTS