Dubai Ganesh Utsav | सातासमुद्रापार दुबईत यंदा प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव!   | गणपती बाप्पाच्या आगमनासाठी दुबईकरांची जोरदार तयारी सुरु

Dubai Ganesh Utsav

HomeBreaking News

Dubai Ganesh Utsav | सातासमुद्रापार दुबईत यंदा प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव! | गणपती बाप्पाच्या आगमनासाठी दुबईकरांची जोरदार तयारी सुरु

Ganesh Kumar Mule Aug 31, 2024 8:54 AM

Ram Navami 2024 In Dubai | सातासमुद्रा पार दुबईत राम नामाचा गजर आणि जयघोष!
Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
UAE News | दुबई मध्ये रंगला बालपण देगा देवा हा अनोखा उपक्रम | तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केला बालपण देगा देवा कार्यक्रम!

Dubai Ganesh Utsav | सातासमुद्रापार दुबईत यंदा प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव!

| गणपती बाप्पाच्या आगमनासाठी दुबईकरांची जोरदार तयारी सुरु

 

 

UAE Ganesh Utsav – (The Karbhari News Service) – सर्वांनी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. तेव्हापासुन फक्त महाराष्ट्रात नव्हे, हिंदुस्तानात नव्हे तर हिन्दुस्तानाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. मग यामध्ये दुबई ने तरी का मागे राहायच. (UAE Anees)

यंदा Inspire Events आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्रपरिवार यांनी दुबई येथे प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे.

वेस्टझोन प्लाझा हॉटेल अपार्टमेंट्स, कुवैत स्ट्रीट, मनखुल दुबई येथे शनिवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी गणपती बाप्पाचा श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या  वादनाने आगमन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर दिवसभरात भजन व सामूहिक गणेश जाप, दुपारची आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळची आरती, गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम होतील.

रविवार ८ सप्टेंबर गणेश पूजन आणि आरती, भजन व सामूहिक गणेश जाप, संस्कृती मराठी मंडळाचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण संध्याकाळची आरती आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, गणेश विसर्जन व सांगता आरती होईल.

हा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचा कृपाशिर्वाद घ्यावा. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0