Drainage cleaning | Pune Municipal Corporation | नालेसफाई 100% झाली असल्याचा पुणे महापालिकेचा दावा 

HomeBreaking Newsपुणे

Drainage cleaning | Pune Municipal Corporation | नालेसफाई 100% झाली असल्याचा पुणे महापालिकेचा दावा 

Ganesh Kumar Mule Jun 15, 2023 4:16 PM

Drainage cleaning | Pune Municipal Corporation | PMC claims that the drainage has been cleaned 100%
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामाबद्दल भाजपकडून भांडारकर रोडवर धरणे आंदोलन
Pune Municipal Corporation | तुमच्या परिसरात नालेसफाई झाली नाही? मग पुणे मनपाच्या या अधिकाऱ्यांना फोन करा

Drainage cleaning | Pune Municipal Corporation | नालेसफाई 100% झाली असल्याचा पुणे महापालिकेचा दावा

Drainage cleaning | Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) नाल्यामधील (Drainage) ९५ क्रिटिकल स्पॉट पैकी ९५ क्रिटिकल स्पॉटची साफसफाई केली असून व ३८२ कल्व्हर्टस पैकी ३८२ कल्व्हर्टसची १००% साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. असा दावा पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने करण्यात आला आहे. (Drainage cleaning | Pune Municipal Corporation)

महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) पावसाळा पुर्व (Before Monsoon) कामे करण्यात येत असून त्यामध्ये नाला साफसफाई करणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण करणे, पावसाळी लाईन व चेंबर्स साफसफाई करणे तसेच आवश्यकतेनुसार दुरूस्ती कामे करण्यात येतात.

पुणे महानगरपालिकेमार्फत नाल्यामधील ९५ क्रिटिकल स्पॉट पैकी ९५ क्रिटिकल स्पॉटची साफसफाई केली असून व ३८२ कल्व्हर्टस पैकी ३८२ कल्व्हर्टसची १००% साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. एकुण
नाल्यांच्या लाबी पैकी आवश्यक असणारी १६५ कि.मी लांबीच्या नाल्यांची साफसफाई व गाळ काढणे व काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आलेले आहे.
पुणे शहरातील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचू नये याकरीता दक्षता घेण्यात येत असून आस्तित्वातील चेंबर्स पैकी आवश्यक असणारे ४८ हजार चेंबर्समधील गाळ काढला असून १८४ कि.मी लांबीच्या पावसाळी लाईन साफ करण्यात आलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर पाणी साचु नये म्हणुन फुटपाथचे कडेने नवीन पावसाळी चेंबर्स तयार करून पावसाळी लाईनला जोडण्याची कामे करण्यात येत आहेत. अशा प्रकारे क्रिटीकल स्पॉट, कल्व्हर्टस, नाले साफसफाई व स्टॉर्म वॉटर चेंबर्स व नलिका आवश्यकतेनुसार साफसफाईची कामे पुर्ण करण्यात आलेली आहे.
पावसाळा कालावधी मध्ये देखील ही साफ सफाईची कार्यवाही सुरू राहणार आहे. याकरीता पुणे मनपा भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून त्यासाठी फोन नं. १ ) ९६८९९३०५३१ २) ९६८९९३५४६२ या नंबर व्हॉटसअप द्वारे २४x७ नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे.
तसेच पावसाळी कालावधी मध्ये आपत्ती व्यवस्थापने अंतर्गत रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन निवारण करणेकरीता कनिष्ठ/शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाचे स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष करून बिगारी सेवक रात्रपाळीत ठेवण्यात आलेले आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-
News Title | Drainage cleaning Pune Municipal Corporation | Pune Municipal Corporation claims that the drainage has been cleaned 100%