प्रारूप मतदारयादी | हरकती सूचनांसाठी दोन दिवसाचा अवधी वाढवला | 3 जुलै पर्यंत दाखल करू शकता हरकती
| राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
| असे आहेत आदेश
राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार २३ जून, २०२२ ते १ जुलै, २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून ९ जुलै, २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची वेळ वाढवून मिळण्याबाबत मागणी होत आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या टू व्होटर अॅपच्या माध्यमातून देखील हरकती व सूचना दाखल होत
आहेत. यास्तव, सदर १४ महानगरपालिकांकरिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अखेरचा दिनांक १ जुलै, २०२२ ऐवजी ३ जुलै, २०२२ असा सुधारित करण्यात येत आहे. मात्र मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याच्या दिनांक ९ जुलै, २०२२ हाच राहील. ३ जुलै, २०२२ रोजी रविवारची सुट्टी असली तरी हरकती व सूचना दाखल करुन घेण्याच्या अनुषंगाने योग्य ती व्यवस्था महानगरपालिकेने करावी तसेच हरकती व सूचना दाखल करण्याच्या सुधारित
दिनांकास योग्य ती प्रसिध्दी महानगरपालिका क्षेत्रात देण्यात यावी.