Dr. Siddharth Dhende | डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व 

HomeBreaking Newsपुणे

Dr. Siddharth Dhende | डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व 

Ganesh Kumar Mule Apr 11, 2023 1:44 PM

Employment Fair | बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन
MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
PMC Ward no 2 | प्रभाग दोन साठी आयुक्तांचे मान्सून ‘गिफ्ट’ | ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर दरम्यान पावसाळी लाईनसाठी दीड कोटींची मंजुरी

डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

–   डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प

निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. १३२ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हा संकल्प केला असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्याने अनेक मुलांचे आयुष्य भरकटले जात आहे. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. समाजाची एक पिढी नाहक गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत असताना विविध ठिकाणी फिरताना ही परिस्थिती निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाविषयी आधार देण्याचा मानस केला होता. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचा सर्वत्र माहोल आहे. त्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रम माझ्या पुढाकाराने आयोजित केले जात आहेतच. मात्र यंदा १३२ निराधार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलणार असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्या वर्षापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी निराधार विद्यार्थ्यांच्या पालकांनी नागपूर चाळ येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ९६८९९३४२८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन, डॉ. धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा करत असताना शिक्षण या विषयाला खूप महत्व दिले आहे. लोकांना गुलामीतून, आर्थिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होतो. अन्यायाला वाचा फोडली जाते. समाजात ज्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरविले आहे. ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे निमित्त साधत निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका