Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप

HomeBreaking Newsपुणे

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप

कारभारी वृत्तसेवा Nov 23, 2023 6:24 PM

Dr Siddharth Dhende | दुकानदारांकडून धान्य विक्रीतील काळा बाजार न थांबल्यास उपोषण करू | पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा
Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे
PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप

| कारवाई करण्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे पोलिस निरिक्षकांना निवेदन

| येरवडा पोलिस प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन

 

Dr Siddharth Dhende | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) प्रभाग क्रमांक दोन (Ward no 2) मधील अवैध धंद्यांना आता चाप बसणार आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी येरवडा पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला. त्याची दखल घेत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण कदम यांनी डॉ. धेंडे यांना दिले आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. तरूणाई व्यसनांच्या आहारी गेली आहे. यामध्ये प्रामूख्याने पंचशील नगर, चंद्रमा नगर, जाधव नगर, राजीव गांधीनगर, पाटबंधारे वसाहत, अहिल्या सोसायटी, करुणा सोसायटी, आंबेडकर कॉलनी परिसरातील नागरिकांनी सातत्याने तक्रारींचे गार्‍हाणे मांडले होते. या परिसरात बेकायदेशीर मद्यविक्री (दारु), जुगार, मटका तसेच नशा आणणारे ड्रग्स यांची विक्री होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. गुंडांकडून परिसरात भिती पसरवली जाण्याचे प्रकार होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

भीतीपोटी नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्याकडे पाठ फिरवत आहेत. लहान मुले व तरुणाई व्यसनांना बळी पडत आहेत. नशेच्या आहारी गेल्यामुळे एक पिढी वाया जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर वारंवार वाद होणे. महिलांना व जेष्ठांना असुरक्षेतेची भावना निर्माण झालेली आहे. या बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांना काही जण आर्थिक व राजकीय पाठबळ देत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध धंदे करणार्‍यांवर तसेच गुंडांवर जरब बसवावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी निवेदनाद्वारे केली. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या बाबत त्वरीत कार्यवाही करून अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करू, असे आश्वासन पोलिस निरिक्षक कदम यांनी दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
——————-
डिसेंबर रोजी वॉर्ड सभेचे आयोजन* –

प्रभाग क्रमांक दोन मध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रभागातील विद्युतच्या अडचणी, खराब रस्ते, चौकांची झालेली दुरवस्था, अवैध धंडे आदीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यावर त्वरीत योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे.
———————-

प्रभागात अवैध धंदे करणार्‍यांची संख्या वाढली आहे. तरूणाई व्यसनांच्या आहारी गेली आहे. त्यामुळे परिसरात भांडणे, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या बाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत मी निवेदन दिले आहे. अवैध धंदे बंद करून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. त्याची कार्यवाही न झाल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————————-