Dr Siddharth Dhende | चाइल्ड केअर सेंटर उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे
| प्रभाग क्रमांक 2 मधील छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा
Dr Siddharth Dhende | पुणे महानगरपालिका (Pune Municipal corporation) व अर्बन 95 (Urban 95g संस्थेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. नुकतेच छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटर (Child Care Centre) सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील हा पहिला प्रकल्प सुरू होत आहे. त्याचा प्रभागातील नागरिकांना, लहान बालकांना मोठा फायदा होणार आहे. या अगोदरही पुणे शहरातील पहिले “हर्बल गार्डन ” तसेच लुंबिनी उद्यानातील पहिला ” बाल मेळावा ” नागरिकांच्या सहकार्याने सुरू करता आला, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी केले.
डॉ. धेंडे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील छत्रपती शिवराय दवाखाना या ठिकाणी चाइल्ड हेल्थ केअर सेंटर आणि आयटीसी सुरू करण्यात आले. पुणे महानगरपालिका व अर्बन 95 संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते.
या वेळी नामदेवराव घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती वर्पे, अर्बन 95 संस्थेचे सर्वेसर्वा दीक्षित आणि त्यांचे सहकारी, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सांडभोर आणि त्यांचे सहकारी, चैतन्य हास्य योग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आम्रे आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, त्रिदलनगर, शांतीरक्षक सोसायटी व नागपूर चाळ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैलास रणपिसे, विजय कांबळे, गजानन जागडे, हेमंत मोरे, प्रताप धुमाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
——-
या सुविधा मिळणार
पुणे महापालिका आणि अर्बन 95 संस्थांमार्फत लहान मुलांच्या बौद्धिक वाढीकरिता आणि सर्वांगीण विकासाकरिता तसेच जेष्ठ नागरिक, महिलांच्या सुविधेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुणे शहरात प्रथम त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ. धेंडे यांच्या पाठपुराव्यामुळे हर्बल गार्डन तयार करण्यात आले. आयटीसी फ्रेन्डली प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये गरोदर महिलांना गर्भ संस्कार स्वतंत्र कक्ष, हिरकणी कक्ष, बालसंगोपन कक्ष, जेष्ठ नागरिकांना अद्ययावत विरंगुळा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंग कक्ष निर्मिती करण्यात येणार आहे.
——————-
पुणे महापालिका आणि अर्बन 95 अंतर्गत अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये चाईल्ड केअर सेंटर सुरू करता आले. त्याचा लहान मुलांना फायदा होणार आहे. तसेच आयटीसी सेंटरच्या माध्यमातून महिलांना उपचार घेता येणार आहेत.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका