Dr Narendra Dabholkar | डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी अंनिसचे रक्तदान शिबीर
| महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम
Dr Narendra Dabholkar | अंधश्रद्धा निर्मूलनाच्या (Andhshraddha Nirmulan Samiti) कामाचे अध्वर्यू डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०२३ रोजी १० वर्षे होत आहेत. या काळात संघटनेने विविध आंदोलने, मोर्चे, निषेध सभा, उपक्रम घेऊन कारवाईची मागणी केली. मात्र अद्यापही आरोपींवर कारवाई होऊ शकली नाही. यंदाही डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार भवनच्या मागील बाजूला असलेल्या एस एम जोशी सभागृह येथे रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजित केले आहे. ”तुम्ही रक्त घेऊन प्राण घेता – आम्ही रक्त देऊन प्राण वाचवतो” हाच संदेश या रक्तदान शिबिरातून डॉ. दाभोलकरांचा हत्या केलेल्या धर्मांध, सनातनी शक्तींना मिळेल. (Dr Narendra Dabholkar)
रक्त आणि रक्तातील घटक हे मनुष्यासह सर्वच प्राण्यासाठी प्राणाइतकेच आवश्यक आहेत. पण प्राणाचे मूल्य माहीत नसणाऱ्या सनातनी धर्मांध शक्ती समाजात आहेत. याच शक्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करून, त्यांना रक्तबंबाळ करून, त्यांचे प्राण घेतले. मात्र सजग नागरिक, कार्यकर्ते 15 ऑगस्टला रक्तदान करून अहिंसेचा संदेश देतात. यंदाही नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानातून मानवतावादाशी आणि स्वातंत्र्यलढ्याशी घट्ट नाते जोडावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर पुणे शाखेने केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी शिबीर समन्वयक विशाल विमल 7276559318 यांच्याशी संपर्क साधावा.
——
News Title | Dr Narendra Dabholkar Dr. Annis blood donation camp on Independence Day on the occasion of Dabholkar’s memorial day