Diwali 2024 -| मुळशी येथील गोरगरीब कातकरी, आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी | विविध गणेश मंडळांचा उपक्रम!

Homecultural

Diwali 2024 -| मुळशी येथील गोरगरीब कातकरी, आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी | विविध गणेश मंडळांचा उपक्रम!

Ganesh Kumar Mule Oct 28, 2024 1:34 PM

Pune PMC Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा २८ ऑक्टोबर पासून | प्रवेशशुल्क अवघे ५ ते १० रुपये
Diwali Gifts | Tax | दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर भरावा लागेल का?  |  भेटवस्तूंवरील कराचे गणित काय आहे ते जाणून घ्या
Bhaubij Diwali | भाऊबीज निमित्त पोस्टमन काकांचा सन्मान | भरत आणि योगिता सुराणा यांचा उपक्रम

Diwali 2024 -| मुळशी येथील गोरगरीब कातकरी, आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी | विविध गणेश मंडळांचा उपक्रम!

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुळशी तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी कातकरी, कातकरी व आदिवासी वस्तीवरील पस्तीस कुटुंबांसोबत दिवाळीसण साजरा करण्याचा अभिनव विधायक उपक्रम जय गणेश व्यासपीठ मधील गणेश मंडळांनी राबविला. सलग 12 वर्षे हा उपक्रम मंडळे राबवित आहेत.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट , मॉडेल कॉलनी येथील अजिंक्य मित्र मंडळ यांचा वतीने लवासा रस्त्यावरील *पिरंगुट , गाडेवाडी व कुंभार वाडी येथील पस्तीस कुटुंबांना* लाडू , चिवडा , करंजी, चकली, शंकर पाळी, या दिवाळीच्या फराळासह आकाश दिवे, पणत्या, फटाके व कपडे भेट दिले.

दिवाळीचा आनंद त्या वंचितांना देखील साजरा करता यावा म्हणून पुण्यातील गणेश मंडळे हा उपक्रम सातत्याने दिवाळीला राबवित आहे . वस्तीतील घराच्या अंगणात आकाशकंदील लावला, मुलांच्या सोबत फटाके फोडले , चिमुकल्यांना कार्यर्कत्यांनी आपल्या हाताने लाडाने फराळ भरवला , दिवाळीची अशी भेट पाहून सर्वांचे चेहरे आनंदाने उजळले होते….

साईनाथ मंडळाचे पीयूष शहा,नंदू ओव्हाळ, अभिषेक निंबाळकर व अजिंक्य मित्र मंडळाचे उमेश शेवते, अजिंक्य भुजबळ, सुशांत साळवी व गुंजन शेवते यांनी आयोजन केले होते.  तसेच बेलवडे गावाचे रवी जधव उपस्थित होते पुण्यातील गणेश मंडळांनी अचानक दिवाळीनिमित्त दिलेल्या या आनंददायी भेटीमुळे वस्तीवरील लहान मुले त्यांचे पालक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तविक पियूष शाह यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0