Dipa Mudhol Munde IAS | बाल विवाह निर्मुलनाकरीता दिपा मुधोळ-मुंडे यांना स्कॉच संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Homeadministrative

Dipa Mudhol Munde IAS | बाल विवाह निर्मुलनाकरीता दिपा मुधोळ-मुंडे यांना स्कॉच संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Ganesh Kumar Mule Sep 05, 2024 8:57 PM

Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम
Satish Alekar | Plays | सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या संचाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन
Garbage collection Vehicles | पालकमंत्र्यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण | वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार

Dipa Mudhol Munde IAS | बाल विवाह निर्मुलनाकरीता दिपा मुधोळ-मुंडे यांना स्कॉच संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 

Dipa Mudhol Munde PMP – (The Karbhari News Service) – बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांना “स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला आहे.

स्कॉच संस्थेकडून विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरीता दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.श्रीमती मुधोळ ह्या बीड जिल्हाधिकारी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध सकारात्मक पाऊले उचलण्यात आली. परिणामी बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याच कामाची दखल घेत स्कॉच संस्थेच्यावतीने त्यांची निवड केली आहे.

स्कॉच संस्थेच्यावतीने नवी दिल्ली येथे २१ सप्टेंबर रोजी आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा श्रीमती मुधोळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0