New Fire Chief | देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती

HomeBreaking Newsपुणे

New Fire Chief | देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती

Ganesh Kumar Mule Aug 29, 2022 4:44 PM

Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने
Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस
FRP Law | Vitthal Pawar Raje | ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा एफआरपी चा कायदा रद्द करा.! | विठ्ठल पवार राजे 

 देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती

| अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए )चे मुख्य अग्निशमन अधिकारी
देवेंद्र पोटफोडे यांची महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिका च्या मुख्य अग्निशमन अधिकारी या रिक्त पदावर अतिरिक्त कारभार देऊन नियुक्ती केली असून पीएमआरडीए अग्निशमन विभागा बरोबरच महापालिका अग्निशमन दलाचा कार्यभार पाहणार आहेत. अत्यंत सकारात्मक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्यातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठ्या महानगर पालिका व सर्वात मोठ्या महानगर प्राधिकरण अग्निशमन प्रमुख पदी नेमणूक होताच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला.

देवेंद्र पोटफोडे हे राष्टीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून सुवर्णपदक विजेते असून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांनी अग्निशमन विभागाच्या सेवेत आहे. एमआयडीसीमध्ये तसेच पुणे महानगरपालिका (पीएमसी) चे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणूनही या पूर्वी जबाबदारी सांभाळलेली आहे. एमआयडीसी ची औद्योगिक क्षेत्रे आणि शहरी भागात अनेक फायर, रेस्क्यू कॉल्स, भीषण आगीची दुर्घटना, स्फोट, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनां स्वतःच्या नेतृत्वात यशस्वीरित्या सामना केला असून, अलीकडच्या काळातील, सिरम इन्स्टीटयूटमधील आगीची दुर्घटना आणि पिरगुंट येथील एस व्ही ऍक्वा ही त्यापैकीच काही उदाहरणं आहेत .

बांधकाम नियंत्रण नियमावली आणि एनबीसी च्या तरतुदींनुसार विविध प्रस्तावित नागरी तसेच औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या प्रकल्पांना अग्निशमन मंजूरी देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलीअसून कोविड काळात संपूर्ण राज्यात सर्वात सक्षम व प्रभावी पणे पुणे जिल्ह्यातील रग्णालयांचे फायर ऑडिट समन्वयाचे काम त्यांनी पार पाडले आहे. राज्य सरकारच्या अनेक अग्निशमन विषयक समित्यांवरही तांत्रिक तज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रिया, दुबई आदी देशातील विकसित अग्निशमन सेवांना भेटी दिल्या आहेत. तर २०११ आणि २०२१ असे दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त असून त्यांनी राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक व विशिष्ट अग्निशमन सेवा पदकही पटकाविलेले आहे.
पुणे अग्निशमनदला ची प्रतिमा देशपातळीवर उंचावण्याची मनीषा त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताना केली.