Devendra Fadnavis in Pune | वेताळ टेकडी, नदी सुधार बाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका : काय म्हणाले? वाचा सविस्तर
Devendra Fadnavis in Pune | शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मत आहेत त्याचा मी आदर करतो. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत. पण हे करत असताना काही लोकं हे केवळ विकास थांबला पाहिजे या मताचे जे असतात ज्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नसत, तज्ज्ञ नसतात पण आमचच म्हणणं खरं आहे असा विचार करणार्यांचे आपल्याला ऐकता येणार नाही. अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या लाखो पुणेकरांचं जीवनमान जर आपल्याला सुधरवायचं असेल तर महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. (Devendra Fadnavis in Pune)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पौड फाटा बालभारती रस्ता (Pauda fata to Balbharti road) आणि नदी काठ सुधार प्रकल्प (River front Devlopment project) बाबत पर्यावरणवादी (Environmentalist) नागरिकांची बैठक घ्यावी अशी मागणी या कार्यक्रमात केली त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, जगामध्ये शाश्वत विकासासाठी ज्या उत्तम कार्यपद्धती आहेत ते आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही विकासामध्ये विनाश होऊ नये हे खरे असले तरी काहीजण कमी माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीवर प्रकल्पाला विरोध करतात त्यामुळे प्रकल्प थांबतो जगाच्या पाठीवर जे प्रकल्प शाश्वत ठरलेले आहेत मग ते आपल्याकडे का होऊ नयेत असा प्रश्न देखील फडणवीस यांनी केला. पुण्यातील प्रकल्प करताना सर्वांच्या बाजू ऐकल्या जातील पण प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक तुमची बाजू एक आमची बाजू पण खरी बाजू समजून घ्यायचे असेल तर तज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणून जे पर्यावरणवादी असतील किंवा ज्या लोकांना पुण्याच्या संदर्भात अतिशय आत्मियता आहे त्यांचे म्हणणं निश्चित ऐकून घेऊ. पुणे हे केवळ ऐतिहासिक शहर नाही तर हे भविष्यातला शहर देखील आहे. जगाच्या पाठीवर या २१व्या शतकांमध्ये नॉलेज सिटी म्हणून पुणे शहर आहे. महाराष्ट्र देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये 20 टक्क्यांचा वाटेकरी आहे. या मध्ये सिंहाचा वाटा पुण्याचा आहे. त्यामुळे इथली वाढती लोकसंख्या ही विचारात घेता हे शहर राहण्यासाठी योग्य बनले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सगळ्या गोष्टींचे मुबलक प्रमाणात उपलब्धता असली पाहिजे. या दृष्टीने पुण्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . पुण्यामध्ये 27 हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड निर्माण केला जाणार आहे पण या रिंग रोडच्या भोवती तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा रिंग रोड पुण्याचे ग्रोथ इंजिन असेल असेही फडणवीस म्हणाले. पुण्याला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध असला तरी वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे पुणे तहानलेले आहे त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झालेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
——
——
News Title | Devendra Fadnavis in Pune | Devendra Fadnavis clarified his position regarding Vetal hill, river improvement: What did he say? Read in detail