आजी असूनही ‘त्या’ मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या
: उद्धव ठाकरेंकडून चंद्रभागा शिंदे उर्फ ‘फायर आजीचं’ कौतुक
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर आंदोलनादरम्यान साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्याआजी चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले. पुष्पा स्टाईलमध्ये झुकेगा नही असा इशारा त्यांनी दिला होता. परळमध्ये आजींच्या घरी मुख्यमंत्री सहकुटुंब आभार मानण्यासाठी आजींच्या घरी पोहचले.
८० वर्षाच्या शिवसैनिक असलेल्या आजी मातोश्रीबाहेर आंदोलनात दोन दिवस उपस्थित होत्या.या भेटीदरम्यान आजींनी मुंबईत शिवसेनाच येणार असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे व्यक्ती वयाने मोठी होते पण मनाने तरूण असली पाहीजे, ही आजी असल्या तरी अजूनही मनाने त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत. पण असे शिवसैनिक ही शिवसेना प्रमुखांनी दिलेला सगळ्यात मोठा आशिर्वाद आहे, म्हणून नतमस्तक होण माझ कर्तव्य होतं म्हणून आलो. काल इतक्या रणरणत्या उन्हात त्यांनी झुकेगा नही हा सल्ला त्यांनी दिला. बाळासाहेबांनी दिलेले हे शिवसैनिक झुकणारे नाहीत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजींची भेट घेतल्यानंतर सांगितलं, तसेच आजी आणि त्यांच्या कुटुंबियांना वर्षा बंगल्यावर येण्याचं मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं.मला साहेबांसोबत इतकी वर्ष राहील्याची पोचपावती मिळाली, तसेच साहेब घरी आल्याचा खूप आनंद झाला, माझ्या घराला पाय लागले माझ्या नातवांना आशिर्वाद मिळाले त्याचा खूप आनंद झाला अशी प्रतिक्रीया आजींनी यावेळी दिली. काल अगदी तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याचा विरोध त्यांनी केला होता.
त्यांचा आंदोलनातील सहभाग पाहून त्यांना काहीवेळ मातोश्रीमध्येही बोलावण्यात आलं होतं. तसेच या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या होत्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा देत झुकेगा नही साला, असे देखील म्हणाल्या होत्या.
COMMENTS