मिळकतकर विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे!
: महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे मिळकतकर विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक होते. यासाठी बऱ्याच उपायुक्तांची नावे चर्चेत होते. अखेर महापालिका आयुक्तांनी उपायुक्त अजित देशमुख यांच्यावर मिळकतकर विभागाची जबाबदारी सोपवली आहे. तर देशमुख यांच्याकडील घनकचरा विभागाची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे सोपवली आहे. दरम्यान अजित देशमुख यांना टॅक्स विभागाची जबाबदारी मिळाल्याने काम करणाऱ्या माणसाला चांगले पद आयुक्तांनी दिले, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
: असे आहेत महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील विलास कानडे यांची ‘अतिरिक्त महापलिका आयुक्त’ या पदावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९ अ (१) मधील तरतुदीनुसार श्री. ज्ञानेश्वर मोळक यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या पदावर शासन आदेशान्वये पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. विलास कानडे, यांचेकडील उप आयुक्त (कर आकारणी व कर संकलन) या पदाचा पदभार अजित देशमुख, उप आयुक्त यांचेकडे सोपविण्यात येत आहे. तसेच अजित देशमुख, उप आयुक्त यांचेकडील उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) या पदाचा पदभार
संपुष्टात आणून आशा राऊत, उप आयुक्त (मध्यवर्ती भाडार) यांचेकडे सोपविण्यात येत आहे. आशा राऊत्त, उप आयुक्त (मध्यवर्ती भांडार) यांनी स्वतःचे पदाचे कामकाज सांभाळून उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) या पदाचे अतिरिक्त कामकाज करावयाचे आहे.
संपुष्टात आणून आशा राऊत, उप आयुक्त (मध्यवर्ती भाडार) यांचेकडे सोपविण्यात येत आहे. आशा राऊत्त, उप आयुक्त (मध्यवर्ती भांडार) यांनी स्वतःचे पदाचे कामकाज सांभाळून उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) या पदाचे अतिरिक्त कामकाज करावयाचे आहे.
COMMENTS