Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार

HomeBreaking Newsपुणे

Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार

Ganesh Kumar Mule May 04, 2023 9:50 AM

Deepak Mankar | तरूणांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देते | दीपक मानकर
Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी | पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस! 
Gopichand Padalkar Vs NCP Pune | गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी व सनी मानकर यांच्यावतीने नोकरी महोत्सवाचे 6 मे रोजी आयोजन

पुणे : राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे शहराचे नेते व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

गिरीश गुरनानी, सनी मानकर म्हणाले, दीपक भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दिनांक 6 मे 2023 सकाळी 9.00 वा, उत्सव मंगल कार्यालय, कोथरूड, पुणे. येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची हमखास संधी मिळणार आहे.

या नोकरी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी ऑनलाईन फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी. अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता. अशी माहिती गुरनानी, मानकर यांनी दिली आहे.

अर्जाचे_संकेत_स्थळ :
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या QR Code चा वापर करावा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करावा.
https://shorturl.at/mHRW9
अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता.अधिक माहितीसाठी संपर्क:-7387281150 (केतन), 9579032641(सचिन) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुरनानी यांनी केले आहे.