प्रभाग क्र १९ काशेवाडी – लोहियानगर भागातील सेव्हन लाॅज चौक शंकर शेठ रोड पुणे,या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले आहे यांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, पुणे म.न.पा चे माजी गटनेते आबा बागुल,शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे, स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे चे अध्यक्ष सतीश उबाळे, वाघोली चे सरपंच उबाळे, तेली समाजाचे प्रतिष्ठित सर्व प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उल्हासदादा पवार यांनी आपल्या भाषणात येणा-या पिढीला जगनाडे महाराजाच्या कामाची माहिती, सर्व वारकरी संप्रदाय तसेच भागवत समाजाची माहिती देणारे व समाजसेवेची प्रेरणा देणारे , दिशादर्शक हे उद्यान ठरणार आहे.. असे मत त्यांनी व्यक्त केले.
रमेशदादा बागवे यांनी पुर्वीच्या काळात देखील जगनाडे महाराज व तुकाराम महाराज यांच्या वर करमठ वादयान कडून अन्याय होत होता. तसेच अताचे काही लोक प्रयत्न करतायत ते सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून ते हाणून पाडला पाहिजे असे मत मांडले.
महाराष्ट्रात कुठेच जगनाडे महाराज यांचे नाव असलेले सार्वजनिक उद्यान, समाजमंदिर, वास्तू किंव्हा चौक, नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून तेली समाजाच्या मागणीनुसार हे उद्यान साकारण्यात आले आहे..या उद्यानात महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, त्यांचे अभंग, भागवत समाज व वारकरी संप्रदाय ची परंपरा. तथा इतिहासाची माहिती दर्शविणारे चित्र येथे आहे असे स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले.
प्रास्ताविक सुदुंबरे संस्थांचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले तर आभार क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान चे विठ्ठल थोरात यांनी केले.