Datta Bahirat | Ajit Pawar | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी | राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता बहिरट यांची महापालिका आणि पीएमआरडीए कडे मागणी 

HomeBreaking News

Datta Bahirat | Ajit Pawar | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी | राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता बहिरट यांची महापालिका आणि पीएमआरडीए कडे मागणी 

Ganesh Kumar Mule Jan 31, 2026 1:58 PM

Pune, Airport : Sharad Pawar : पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!
Bhushi Dam | लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
PMC 75th Anniversary | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

Datta Bahirat | Ajit Pawar | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी | राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता बहिरट यांची महापालिका आणि पीएमआरडीए कडे मागणी

 

Ajit Dada Pawar – (The Karbhari News Service) – पुणे विद्यापीठ चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे नामकरण स्वर्गीय नामदार श्री. अजितदादा अनंतराव पवार उड्डाणपूल” याप्रमाणे करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी चे नगरसेवक दत्ता बहिरट पाटील यांनी याबाबत महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्त यांना पत्र दिले आहे. दरम्यान याबाबत दोन्ही कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती बहिरट यांनी दिली. (Pune University Chowk Double Flyover)

बहिरट यांच्या पत्रानुसार  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते  अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला पण त्यांच्या स्मृती आपल्या हृदयात कायम राहतील हे निश्चित.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड सह राज्यात अनेक विकासकामे झाली त्या कामांत सन्माननीय अजित दादांचा सिंहाचा वाटा आहे हे मान्यच करावे लागेल. अजितदादा म्हणजे कामाचा प्रचंड रक आणि प्रशासनावर दरारा असलेले व्यक्तिमत्त्व ‘शब्दाला पक्का नेता’ ही त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावणारा लोकनेता आपण गमविला आहे. प्रशासकीय कामातली त्यांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन नेहमीच थक्क करणारे असायचे, कामात कसलीही दिरंगाई त्यांना खपत नसे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच राज्याच्या विकासकामांना नेहमी गती मिळाली. संपूर्ण राज्याला विकासाची नवी दृष्टी देणारे दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांची उणीव सदैव भासत राहील.

अजित दादांच्या निर्णय पैकी एक म्हणजे  शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा निर्णय म्हणजे पुणे विद्यापीठ चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुल होय. यापुलाचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असून लवकरच हा दुमजली उड्डाणपुल पुणेकरांना वाहतुकीसाठी खुला होईल.

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करणाऱ्या या दुमजली उड्डाणपुलाचे नामकरण “स्वर्गीय नामदार श्री.अजितदादा अनंतराव पवार उड्डाणपूल” याप्रमाणे करून त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन हिली. त्यामुळे ती मागणी मी नागरिकांच्यावतीने  मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य , आयुक्त (PMRDA) आणि आयुक्त – पुणे महानगरपालिका यांचेकडे केली असून त्यांच्याकडून देखील सकारात्मक कार्यवाही होईल असे सांगण्यात आले आहे. असे बहिरट यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: