CSR | Pune Municipal Corporation | CSR माध्यमातून कोविड काळात पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!
CSR | Pune Municipal Corporation | कोविड जागतिक महामारीच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ५४ लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.२२ कोटी रुपये पडून आहेत. अशी माहिती सजग नागरिक मंचाने (Sajag Nagrik Manch) उजेडात आणली आहे. (CSR | Pune Municipal Corporation)
याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि कोविड काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणाऱ्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करायला पुढे येतील का असा विचारही आपल्या व आपल्या अधिकार्यांच्या मनात आला नाही याचे वैषम्य वाटते. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे. यावर कळस म्हणजे या पैशांचा वापर महापालिका इस्पितळ व दवाखाने यातील उपकरणे खरेदीवर करण्याऐवजी आपल्या आरोग्य विभागाने एका खाजगी इस्पितळासाठी ( बोपोडी आय हाॅस्पिटल) दोन कोटी रुपयांची उपकरणे घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. (PMC Pune News)
—-
आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात ही सगळी माहिती मिळाली म्हणून निदान या गोष्टी चव्हाट्यावर तरी आल्या. या ७ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी. अशी आमची मागणी आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे
News Title |CSR | Pune Municipal Corporation | Donation of 7 crores given to Pune Municipal Corporation during Kovid period through CSR went unused!