Counting of Maharashtra Assembly Votes | मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त

Homeadministrative

Counting of Maharashtra Assembly Votes | मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त

Ganesh Kumar Mule Nov 22, 2024 7:57 PM

Maharashtra Vidhansabha Election | विधानसभा निवडणूक मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Vijaystambh Sohala | पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 

Counting of Maharashtra Assembly Votes | मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त

 

Dr Suhas Diwase IAS – (The Karbhai News Service) – पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी ५२८ सूक्ष्म निरीक्षक, ५५३ मतमोजणी पर्यवेक्षक तसेच ५७७ मतमोजणी सहायक असे १ हजार ६५८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय राखीव ४५८ अधिकारी, कर्मचारी असे एकूण २ हजार १४३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. (Maharashtra Vidhansabha Election Results)

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील ८ हजार ४४३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. मतमोजणी साठी जुन्नर ८७, आंबेगाव ८५, खेळ आळंदी ७७, शिरूर ९०, दौंड ५७, इंदापूर ६१, बारामती ७७, पुरंदर ५९, भोर ९७, मावळ ६६, चिंचवड ८७ ,पिंपरी ९८, भोसरी ८७, वडगाव शेरी ८९, शिवाजीनगर ६२, कोथरूड ८७, खडकवासला ८०, पर्वती ९३, हडपसर ९३, कॅन्टोन्मेंट ६० आणि कसबा पेठ ६६ याप्रमाणे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही निवडणूक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0