PMC : Corporators : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महापालिका बदनाम होतेय; आता तरी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार की नाही? 

HomeBreaking Newsपुणे

PMC : Corporators : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महापालिका बदनाम होतेय; आता तरी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार की नाही? 

Ganesh Kumar Mule Nov 18, 2021 1:33 PM

PMC : पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!  : राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध 
Corporators : Budget Provision : सर्वपक्षीय नगरसेवकांना आत्मविश्वास पुन्हा निवडून येण्याचा! 
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महापालिका बदनाम होतेय; आता तरी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार की नाही?

: महापालिका मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

पुणे : महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. याबाबत आता सर्वपक्षीय नगरसेवक गंभीर झाले आहेत. कारण त्यांना आगामी काही दिवसांत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जायचे आहे. त्यामुळे आता याबाबत सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महापालिका बदनाम होतेय; आता तरी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार की नाही? का फक्त नगरसेवकांवरच गुन्हे दाखल करणार? असे प्रश्न नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. शिवाय भ्रष्ट प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

: श्रीनिवास कंदूल यांना किती दिवस वाचवणार?

महापालिकेतील विद्युत विभागात झालेल्या गडबडी बाबत गुरुवारच्या मुख्य सभेत मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि गटनेते साईनाथ बाबर यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे या विषयाबाबत सर्वांनी भाषणे करण्याची मागणी केली. त्यानुसार सभापती सुनीता वाडेकर यांनी याबाबत चर्चा करण्यास परवानगी दिली. त्यानुसार वसंत मोरे यांनी आरोप केले कि किरकोळ प्रकरणात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निलंबित करता मग जिथे करोडो ची गडबड ज्या अधिकाऱ्याकडून होते त्यांना अभय का देता? मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत; शिवाय फॉरेन्सिक चाचणी देखील करायला हवीय. काँग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रशासनाला धारेवर धरत या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सर्व चाललेले असते.  अरविंद शिंदे यांनी महापालिकेतील वेगवेगळ्या विभागातील प्रकरणाचा पाढा वाचला. शिंदे म्हणाले, महापालिकेत एवढी प्रकरणे झाली पण आतापर्यंत फक्त नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एकही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. पुणे मनपा बदनाम होत असताना आतातरी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करणार कि नाही, असा प्रश्न शिंदे यांनी विचारला. शिंदे पुढे म्हणाले, कितीतरी प्रकरणात विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदूल यांना अभय देण्यात आले आहे. एवढ्या गडबडी होऊन देखील का अभय देता त्यांना? याबाबत आता प्रशासनाने गंभीर व्हायला हवे आहे.

: दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे सभागृह नेत्यांचे आदेश

काँग्रेस चे गटनेते आबा बागुल म्हणाले, महापालिकेत एवढ्या गडबडी होत आहेत कि आता त्या भ्रष्टाचार शब्दाला देखील लाज वाटत असेल. हे आता थांबायला हवे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करायला हवी आहे. शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, दोषी लोकांवर कारवाई झाली नाही तर आम्ही पुढची मुख्य सभा चालू देणार नाही.  विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी अशा प्रकारांचा निपटारा करण्याची मागणी करत तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. सभागृह नेते  नेते गणेश बिडकर म्हणाले महानगपालिकेचे खोटे शिक्के, सह्या तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा उघडकीस आलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. पालिका आयुक्तांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल केला पाहिजे. यामध्ये केवळ एक व्यक्ती सहभागी नसून अनेकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये ‘झारीतील शुक्राचार्य ‘ शोधले पाहिजेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांनी पार पाडली पाहिजे. या प्रकरणामध्ये केवळ चर्चेवर न थांबता प्रशासनाने काय कारवाई केली, याचा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0