सर्वपक्षीय नगरसेवकांना आत्मविश्वास पुन्हा निवडून येण्याचा!
: आपल्या आणि लगतच्या प्रभागात 5 ते 500 कोटी पर्यंतची कामे सुचवली
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक नजदिक येत आहे. नुकताच महापालिका प्रशासनाने प्रभागाचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. इकडे सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. नगरसेवकांना आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा आपण आपल्या प्रभागातून निवडून येणार आहे. त्यामुळे हे नगरसेवक आपल्या आणि लगतच्या प्रभागातील कामे करण्यासाठी पुढील बजेट मध्ये तरतुदी सुचवत आहेत. 5 कोटी पासून ते 500 कोटी पर्यंत ही कामे सुचवण्यात आली आहेत. गेल्या 2 आठवड्यापासून प्रशासनाकडे अक्षरशः नगरसेवकांच्या पत्रांचा पाऊस पडला आहे. महापालिकेच्या वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे.
: नगरसेवकांच्या पत्रांचा पाऊस
महापालिका प्रशासनाने प्रभागाचा प्रारूप आराखडा सादर केल्यापासून महापालिका निवडणूक लवकरच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे इच्छुक लोक देखील कामाला लागले आहेत. दरम्यान आताच्या नगरसेवकांचा कालावधी 14 मार्च रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे हे लोक देखील कंबर कसून कामाला लागले आहेत. हे नगरसेवक 4 च्या प्रभागात निवडून आले होते. आता तीन चा प्रभाग होणारआहे. त्यामुळे सर्वच गणिते बदलणार आहेत. कारण आहे त्या प्रभागात नवीन भाग जोडला जाऊ शकतो किंवा कमी देखील होऊ शकतो. असे असले तरीही नगरसेवकांना आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा आपण आपल्या प्रभागातून निवडून येणार आहे. त्यामुळे हे नगरसेवक आपल्या आणि लगतच्या प्रभागातील कामे करण्यासाठी पुढील बजेट मध्ये तरतुदी सुचवत आहेत. 5 कोटी पासून ते 500 कोटी पर्यंत ही कामे सुचवण्यात आली आहेत. गेल्या 2 आठवड्यापासून प्रशासनाकडे अक्षरशः नगरसेवकांच्या पत्रांचा पाऊस पडला आहे.
: सर्व काही नागरिकांची वाहवा मिळवण्यासाठी
सद्यस्थितीत प्रभागातील नागरिक नगरसेवकांच्या कार्यालयात आपली कामे घेऊन जात आहेत. त्यावेळी नागरिकांना अशी पत्रे दाखवली जात आहेत. आणि आश्वासन दिले जात आहे कि आम्ही तुमचे काम करणार आहे. शिवाय निवडून आल्यांनतर आम्हीच ही कामे सुचवली म्हणून झाले, असे याच कामाचे क्रेडिट देखील मिळणार आहे. त्यामुळे सर्वच लोक आयुक्तांना पत्र देत आहेत. यामध्ये रस्ते, ड्रेनेज, स्मशानभूमी, लाईट, नवीन गावांत कचरा प्रकल्प, अशा पद्धतीच्या कामाचा समावेश आहे. सध्या तरी नगरसेवकाची कामे प्रशासन करणार नाही. मात्र आगामी काळात प्रशासन यांच्या तरतुदी विचारात घेऊ शकतं. त्यामुळे नगरसेवकांच्या या आत्मविश्वासाची महापालिका वर्तुळात खमंग चर्चा केली जात आहे.
COMMENTS