Open Gym | ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा   | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

HomeपुणेBreaking News

Open Gym | ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

Ganesh Kumar Mule Mar 25, 2023 3:04 AM

Big decision of Pune Municipal Corporation! | 4% DA applicable to employees from July 1
Department of Water Resources | खडकवासला पाटबंधारे विभाग २५ फेब्रुवारी पासून पुणेकरांचे पाणी कमी करणार! 
PMC Ward 9 – Sus Baner Pashan | प्रभाग क्रमांक – ९ –  सुस- बाणेर – पाषाण | बालेवाडी गावठाण ते लमाण वस्ती पर्यंत पसरलेल्या या प्रभागा विषयी सविस्तर जाणून घ्या 

ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा

| मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | २० मार्च ला संयुक्त भुसारी कॉलनी येथील खुले मैदानमधील ओपन जीम येथे व्यायाम करत असताना वीजेचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. याची सखोल चौकशी करून दोषी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनविसे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
कनोजिया यांच्या निवेदनानुसार शॉक लागल्यानंतर प्रथम उपचारासाठी नजिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण उपचार दरम्यान डॉक्टरांनी  मृत घोषित केले. अमोल शंकर नाकते वय २३ असे मृत तरुणांचे नाव असून परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. सदर मैदानात रोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक लहान मुले या ठिकाणी  व्यायाम करतात. सदर भागात जमिनीखालून एम.एस.ई.बी.च्या केबल असल्याचे निदर्शनास आले आहे. घटना घडली,तेव्हा पोलीस, अग्निशमन दल यांना त्वरित कळवण्यातही आले होते. सदर ओपन जीम चा ठेकेदार व अभियंता पुणे मनपा संकल्पना व निधी उपलब्ध करुन देणारे माजी नगरसेवक यांनी नागरीक सुरक्षिततेची कोणतीही काळजी  न घेता  हलगर्जीपणा केला आहे.
एम ई एस बी केबल जमिनी खाली असताना त्यांची एन.ओ.सी घेणे गरजेचे होते. चालु केबल वरच  ओपन जीम साहित्य त्यावर लावुन  नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे. सुरक्षेची काळजी न घेता कानाडोळा करण्यात आला हे स्पष्टपणे दिसून येते. या गंभीर विषयावर स्वतः लक्ष घालून वरिष्ठ अधिकारी यांची समिती स्थापन करुन जबाबदार माजी नगरसेवक ,ठेकेदार, विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन कार्यवाही लवकरात लवकर व्हावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू. असा इशारा कनोजिया यांनी दिला आहे.