Code of Conduct PMC Election | आदर्श आचारसंहितेची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिका करणार आहे या  उपाययोजना 

Homeadministrative

Code of Conduct PMC Election | आदर्श आचारसंहितेची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिका करणार आहे या  उपाययोजना 

Ganesh Kumar Mule Dec 16, 2025 7:18 PM

Summer vacation hobbies | उन्हाळी सुट्टीतील छंद, कला व संस्कार वर्ग संपन्न
Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकर घ्या | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश 
7th Pay Commission | 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी बातमी | केंद्र सरकारने सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पैशाचे काय होणार?

Code of Conduct PMC Election | आदर्श आचारसंहितेची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिका करणार आहे या  उपाययोजना

 

PMC Election 2026 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिका निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. तसेच तत्काळ आचारसंहिता देखील लागू केली आहे. दरम्यान आचारसंहिता ही महापालिकेच्या पूर्ण क्षेत्रात लागू  करण्यात आली आहे. आपल्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमल करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation Election 2026)

 

निवडणूक संनियंत्रण समिती :- महापालिका आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस आयुक्त – पुणे शहर, पुणे महापालिका आयुक्त व अतिरिक्त महापलिका आयुक्त (इस्टेट), पुणे महानगरपालिका यांचा समावेश आहे.

व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक :- निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या महत्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, सभा, तसेच अवाजवी खर्चाबाबत आणि तत्सम आचारसंहितेच्या भंग होणाऱ्या घटनांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनाविलंब माहिती देणेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर व मुख्यालय स्तरावर पथके काम करतील.

भरारी पथक (Flying Squad) :- मतदारांवर प्रभाव पाडतील किंवा प्रलोभन पाडतील तसेच पैशांची व मद्यांची अवैध मार्गाने वाहतूक वा अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके (Flying Squad) तैनात करण्यात येणार आहेत.

चेक पोस्ट साठी पथक :- मतदारांवर प्रभाव पाडतील किंवा प्रलोभन ठरतील अशा वस्तुंची, पैशांची, मद्यांची व शस्त्रास्त्रांची अवैध मार्गाने वाहतूक होऊ शकते अशा ठिकाणच्या नाक्यावर चेकपोस्ट पथक नेमण्यात येणार आहेत.

तक्रार निवारण कक्ष :- महानगरपालिका स्तरावर किंवा महापालिकेच्या प्रभागीय स्तरावर आचारसंहिता भंगाची तक्रार स्व‍िकारण्यासाठी व त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

उमेदवारांना थकबाकी नसल्याच्या दाखल्यासाठी online पद्धतीने अर्ज करण्याची सोय करण्यात येत आहे. घरी बसून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र download करता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: