Chitale Bandhu Mithaiwale | सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी उद्योगाची सूत्रे | संजय चितळे
‘सातत्यपूर्ण प्रयत्न ,ग्राहकांचा गुणवत्तेबाबतचा विश्वास परिवर्तनाला सामोरे जाण्याची तयारी आणि स्वतःला प्रश्न विचारायची मानसिक तयारी ही यशस्वी उद्योगाची चतु:सूत्री आहे’ असे मत चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) यांचे ज्येष्ठ भागीदार संजय चितळे (Sanjay chitale) यांनी मांडले.
मराठवाडा मित्र मंडळ व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव ,प्राचार्य देविदास गोल्हार व उपप्राचार्य प्रा. आर. आर. पंडित उपस्थित होते.
‘उद्योगाने वाजवी नफा कमावला पाहिजे पण अवाजवी नफा आणि अ वाजवी अपेक्षा ठेवता कामा नयेत .सामाजिक भान व सामाजिक बांधिलकी ठेवल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही काळाप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन करत नाविन्याची कास धरली पाहिजे.व्यवसाय करा अथवा नोकरी करा पण स्वतःची आवड जोपासली पाहिजे व कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे’असे प्रतिपादन चितळे यांनी केले
यशस्वी उद्योजक म्हणून काम करणारा उदय जैनाक, राजेश्वरी दिघे ,शंकर गाडे, रोहन कोंडे, केयूर बहिरट आणि राजू दळवी यांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.गोल्हार यांनी आभार मानले तर डॉ.सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.