Chandrayaan 3 | Mohan Joshi | चांद्रयान (३) यशाचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत करावे | मोहन जोशी
Chandrayaan 3 | Mohan Joshi | साऱ्या देशाला अभिमान वाटेल असे चांद्रयान ३ (Chandrayaan 3) ही मोहीम बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी यशस्वी होत आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकाने सायंकाळी चांद्रयान चंद्रावर (Moon) उतरल्याची बातमी न्यूज चॅनेल वरून ऐकायला मिळाली की सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करीत घरात , ऑफिसमध्ये , दुकानात , रस्त्यावर जेथे असाल तेथे जल्लोष करावा. तसेच, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे , विविध संस्था, निवासी सोसायट्या यांनी देखील तिरंगा फडकावत व देशप्रेमाची गाणी लावत शास्त्रज्ञांना शुभेच्छा द्याव्यात व आनंद साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी पुणेकरांना केले आहे. (Chandrayaan 3 | Mohan Joshi)
ते म्हणाले की , यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला बळ मिळेलच शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचा बहुमान वाढेल. अमेरिका , सोव्हीअत युनिअन आणि चीन पाठोपाठ आता भारताने देखील या मालिकेत आपले नाव कोरले आहे. हे कौतुकास्पद आहे. अंतराळ संशोधनांचे महत्व लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी सन २००८ मध्ये चांद्रयान 1 या मोहिमेची पायाभरणी केली, त्यांच्या दूरदृष्टीबद्दल शास्त्रज्ञांसमवेत त्यांचेही अभिनंदन करतो. असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.