राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान!
: एकाच व्यासपीठावर येऊन जनतेसमोर हिशोब मांडू : चंद्रकांत पाटील
पुणे : “महापालिकेत भाजपाची सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे आणि उद्घाटने करत आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान आहे की, त्यांनी आणि आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन त्यांनी आपली सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय काय केलं हे जनतेसमोर मांडावं. आम्ही पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडू.” असं खुले आव्हान भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले आहे.
महापालिका निवडणुकीचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलं असून, भाजपाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या गेल्याच आठवड्यातील वाघोली आणि मांजरीतील प्रचारानंतर आज पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हवेली तालुक्यातील गावांचा दौरा करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तसेच विरोधकांना ५० विरुद्ध पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याचे आव्हान दिले.
पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम जोरदार वाजत असून, भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत १०० पारचा निर्धार केला आहे. त्यातच महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमुळे महापालिका क्षेत्र वाढले असून, या भागात ही भाजपाने आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी हवेली तालुक्यातील पिसोळी, उंड्री, वडाची वाडी, औतडेवाडी, हांडे वाडी, शेवाळेवाडी, होळकर वाडी, उरळी देवाची, उरळी फाटा, भेकराईनगर आणि फुरसुंगी गावाचा दौरा करुन मतदारांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
हांडेवाडी येथील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणत्या निकषांवर महापालिकेत २३ गावांच्या समावेश करण्याचा निर्णय घेतला माहिती नाही. हम करे सो कायदा तत्वाने जुन्या प्रभागांची मोडतोड करत, नवी प्रभाग रचना केली. पण तरीही महापालिकेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देताना आ.पाटील म्हणाले की, “महापालिकेत भाजपाची सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे आणि उद्घाटने करत आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान आहे की, त्यांनी आणि आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन त्यांनी आपली सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय काय केलं हे जनतेसमोर मांडावं. आम्ही पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडू.”
या दौऱ्यात माजी आमदार आणि भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पंडितदादा मोडक, दादासाहेब सातव, नगरसेवक मारुती (आबा) तुपे, संजय घुले, रोहिदास शेठ उंदरे, संदीप लोणकर, राहुल शेवाळे, रणजित रासकर, केशव कामठे, अभिजीत खराडे, आकाश पवार, शोभाताई लागड, जीवनराव जाधव, संदीप हरपळे, धनंजय कामठे, वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे, वैशाली पवार, पांडुरंग रोडे, मंगेश जाधव, विजयाताई वाडकर, स्वाती कुरणे, झांबरे आदी उपस्थित होते.
COMMENTS