Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

HomeBreaking Newsपुणे

Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

Ganesh Kumar Mule Apr 24, 2023 2:12 AM

PMC Pune Solid waste management | दक्षिण गोलार्धातील देशांच्या प्रतिनिधींनी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेचे कौतुक करणे ही चांगली बाब | महापालिका आयुक्त विक्रम कुमार
Blood Donation Camp | एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान | आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक
MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

 सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

 

कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सह माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.