Body Building and Fitness Association | क्रीडा संघटन रत्न पुरस्कार शरद मारणे यांना तर क्रीडा शरीरसौष्ठवपट्टु रत्न पुरस्कार  महेंद्र चव्हाण यांना 

HomeBreaking News

Body Building and Fitness Association | क्रीडा संघटन रत्न पुरस्कार शरद मारणे यांना तर क्रीडा शरीरसौष्ठवपट्टु रत्न पुरस्कार  महेंद्र चव्हाण यांना 

Ganesh Kumar Mule Dec 23, 2025 1:49 PM

Balbharati to Paud Fata road | बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय
Digital Personal Data Protection Bill | डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक काय आहे? त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते जाणून घ्या
Archana Patil | स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा  | माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Body Building and Fitness Association | क्रीडा संघटन रत्न पुरस्कार शरद मारणे यांना तर क्रीडा शरीरसौष्ठवपट्टु रत्न पुरस्कार  महेंद्र चव्हाण यांना

 

Pune News – (The Karbhari News Service) – यंदाचे क्रीडा संघटन रत्न पुरस्काराचे मानकरी शरद मारणे आणि क्रीडा शरीरसौष्ठवपट्टु रत्न पुरस्काराचा मानकरी श्री महेंद्र चव्हाण ठरला आहे.

 

कै. पै. लक्ष्मण रामचंद्र गोळे यांचे स्मरणार्थ बॉडी बिल्डींग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षी क्रीडा क्षेत्राचा वसा स्विकारून निरोगी सुदृढ समाज निर्माण करणाऱ्या संघटन क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना क्रीडा संघटन रत्न पुरस्कार देण्यात येतो. व शरीरसौष्ठव खेळामध्ये पुणे जिल्ह्याचे नाव राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय पटलावर नावलौकिक करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.

पुणे जिल्ह्यातील  शरद मारणे यांनी संघटनेच्या माध्यमातून शरीरसौष्ठव खेळाचे उज्वल भवितव्य घडविले मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात मिस्टर इंडिया व महाराष्ट्र श्री स्पर्धेचे पाच वेळा त्यांनी आयोजन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या संघाबरोबर अनेक वेळा टीम मॅनेजर तसेच खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून काम केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघटनेचे खजिनदार म्हणून आठ वर्षे उत्कृष्टरित्या त्यांनी काम पाहिले. त्यांनी त्यांच्या कार्यातून कार्याचा परीघ सर्वव्यापक व सर्व समावेशक बनवला, खेळाच्या विकासासाठी व भवितव्यासाठी ते सतत अहोरात्र झटत असतात. त्यांचे हे दिव्यकार्य सर्व शरीरसौष्ठव संघटनांसाठी दीपस्तंभा प्रमाणे पथदर्शक व्हावे म्हणून त्यांना क्रीडा संघटन रत्न पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण यांनी पुणे श्री २०११/१२, पुणे जिल्हा २१९ वेळा विजेतेपद, पश्चिम महाराष्ट्र श्री १८ वेळा, महाराष्ट्र श्री ३ वेळा सुवर्णपदक, महाराष्ट्र श्री २ वेळा उपविजेता, महाराष्ट्र श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स २०१९/२०, वेस्टर्न मिस्टर इंडिया २ वेळा विजेता, अखिल भारतीय पुणे महापौर चषक विजेता २०१८/१९, ऑल इंडिया फेडरेशन सुवर्णपदक २ वेळा, अखिल भारतीय फेडरेशन कप चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स २०२०, मिस्टर इंडिया सुवर्णपदक आणि रौप्यपदक, मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड चॅम्पियन सुवर्णपदक प्राप्त करून पुण्याचा व देशाचा बहुमान वाढविला आहे. यासाठी सन्मानपूर्वक त्यांना यंदाचा क्रीडा शरीरसौष्ठवपट्टु रत्न पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य व इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार ऍड विक्रम रोठे व संघटनेचे जनरल सेक्रेटरी अजय गोळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0