सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी |सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर
पुण्यात सीएनजी पंप चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने या संपाची घोषणा करण्यात आली असून, या संपामध्ये पुणे ग्रामीणमधील सर्व पंप चालक सहभागी होणार आहे. यामुळे उद्यापासून पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहे.
पुणे शहरातील ‘एमएनजीएल’ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. ‘उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने १-११-२०२१ रोजी सीएनजी विक्रीतील नफ्फ्याच्या हिस्साचं सुधारित परिपत्रक जारी केलं होतं. त्यानंतरही टोरंट कंपनीने एकही रुपया वाढवून दिलेला नाही’. त्यामुळे पंप चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.