Balbharti – Paud Fata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला जोडरस्ता देणे शक्य नाही
| पुणे महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण
Balbharti- Paud Fata Road | सेनापती बापट रस्ता (Senapati Bapat Road) आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील (Law College Road) वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) बालभारती ते पौड फाटा रस्ता (Balbharti-paud Fata Road) प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता बांधकाम व्यावसायिकांसाठी (Builder) केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता पुणे महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रत्यक्षात या 1.7 किलोमीटरच्या रस्त्याला एकही जोडरस्ता (Junction Road) देता येत नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. (Balbharti-paud Fata Road)
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या सर्वे क्रमांक 44 साठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्या स.नं 44 च्या अर्ध्या भागात हा रस्ता तब्बल 25 फूट उंच ( उन्नत) आहे. तर या उन्नत रस्त्याला कुठेही रॅम्प नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरीत भागात जिथे रस्ता पौड रस्त्याला जोडला जातो. तिथे डोंगराचा ओबडधोबड भाग असून तो कुठेही या सर्वे क्रमांकाला जोडणेच शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (PMC Pune)
पूर्वी या रस्त्यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर महापालिकेने या बाबत खुलासा केल्यानंतर आता बांधकाम व्यावसायिकासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत पालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता या रस्त्यावर कुठेही जोडरस्ता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pune Municipal Corporation News)
महापालिकेचा हा प्रस्तावित रस्ता 1.7 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील 700 मीटर रस्ता जमीनीवरून असून बालभारती समोरून ते विधी महाविद्यालय रस्त्याच्या बाजूला असलेल्या कांचन गल्ली पर्यंत हा रस्ता जमीनीवरून असणार असून कांचन गल्ली पासून तो इलिवेटेड् ( उन्नत) असणार असून तो थेट सर्वे क्रमांक 44 च्या अर्ध्या पेक्षा अधिक भागात या रस्त्यांची उंची जमीनीपासून 8 मीटर ( 24 ते 25 फूट ) असणार आहे. त्यानंतर पुढे हा रस्ता पौड रस्त्याच्या बाजूला उतरावर असणार असून हा भाग टेकडीच्या तीव्र उतरावर तसेच ओबडधोबड रस्त्याने रस्ता उंचीवरच असणार आहे. त्यामुळे या भागातील कोणत्याही बांधकाम व्यावसायिक अथवा महापालिकेचे आरक्षण असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या जागेसही तो जोडलेला असणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. (PMC Pune Road department)
ज्या सर्वे क्रमांक 44 चा उल्लेख करत हा रस्ता आहे असे सांगण्यात येत आहे. त्या सर्वे क्रमांक 44 ला जाण्यासाठी पौड रस्त्यावरील मासळी बाजाराच्या बाजूने स्वतंत्र रस्ता आहे. या शिवाय, पौड फटा फुटतो तिथून एक स्वतंत्र रस्ता असून एआरएआयच्या रस्त्यावरूनही स्वतंत्र रस्ता आहे. तर बालभारती पौड रस्ता आधीच उंच असल्याने तिथून आणखी एक रस्ताच देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे.
—————–
News Title | Balbharti – Paud Fata Road | Balbharti-Poud Phata road is not possible| Explanation of Pune Municipal Administration