Badlapur School Case | बदलापूर च्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करा | दीपाली धुमाळ यांची मागणी

Deepali Dhumal NCP Pune

HomeBreaking News

Badlapur School Case | बदलापूर च्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करा | दीपाली धुमाळ यांची मागणी

Ganesh Kumar Mule Aug 23, 2024 11:50 AM

Deepali Dhumal : सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्याचे पोट भरण्यासाठी योजना बंद पाडण्याचा  उद्योग : विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप 
Dipali Dhumal | पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या | माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी
PMC Schools : Personality Devlopment : महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा!

Badlapur School Case | बदलापूर च्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करा | दीपाली धुमाळ यांची मागणी

 

 

Deepali Dhumal – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारेदेखरेख करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीपाली धुमाळ यांनी शिक्षण विभागाच्या संचालक यांच्याकडे केली आहे.

 

धुमाळ यांच्या निवेदनानुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात दिनांक १२ ऑगस्ट रोजी दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. पोलिसांच्या तपासात सदर शाळेच्या व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी तातडीने आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा पुणे महानगरपालिका शाळा व खाजगी शाळेमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात यावी व खालीलप्रमाणे दिलेल्या गोष्टी करण्याच्या सूचना देण्यात याव्या असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

१. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी नेमण्यात यावेत.

२. शाळांमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करणे.

३.शाळेमधील कायमस्वरूपी आणि ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या आया, मावशी, शिपाई या कर्मचान्यांचे रेकॉर्ड ठेवणे.

४.शाळेमध्ये कर्मचारी भरती करताना त्यांचे गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का नाही ते तपासणी करण्यात यावी.

५. शाळेमध्ये किमान महिन्यातून एकदा Bad Touch & Good Touch प्रशिक्षण देण्यात यावे.

६. विद्यार्थ्यासाठी बस, व्हॅन, रिक्षा या वाहन मालकांची माहिती घेणे.

७. तसेच बसेस मध्ये महिला कर्मचारी नेमणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0