कोंढवा खुर्द परिसरात रस्त्यांची दुरवस्था | वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
कोंढवा खुर्द भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याबाबत पुणे शहर कॉंग्रेस चे सरचिटणीस अशोक जैन यांनी सांगितले कि, कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 27 मधिल L&T वॉटर पाइप लाइन प्रोजेक्ट च्या अंतर्गत गेल्या एक महिन्यापासून खोदाई व पाइप टाकल्यानंतर अनेक जागी पाण्याची लाईन फुटल्या मुळे संपूर्ण रस्त्यावर धो धो पाणी वाहत आहे. चिखल झालेला आहे, वाहने चालविणे नागरिकांना धोक्याचे झालेले आहे, वारंवार अपघात घडत आहेत, रस्त्याची खोदाई केल्यामुळे दुतर्फा रस्त्यावर व कडेला माती, मुरूम, दगडी असा राडारोड़ा पड़ूंन आहे, त्यास अद्याप हटविन्यात आलेले नाही. आवश्यक भराव टाकण्यास व डांबरीकरण करण्यास निश्चित हयगय करीत आहात हे स्पष्ट दिसून येतं आहे. वारंवार ह्या संबंधी फोन करून सुध्दा समाधान कारक उतर देण्यास टाळाटाळ करीत आहात, टोलवाटोलवी चे उत्तर मिळत आहे, कामात अजीबात प्रगति नाही.
जैन यांनी सांगितले कि, पुणे मनपाच्या ऑनलाईन वाटर प्रोजेक्ट चे जूनियर इंजीनियर संदेश शिर्केचे नाव स्पष्ट नमूद केले आहे. तथापि त्यांनी ह्या कामा संबंधी क्षेत्रीय कार्यालय च्या रोड खात्याचे राजश्री बने कदम ह्याचवर जबाबदारी आसल्याचे कळविले आहे. अंतर्गत वादविवाद करूंन नागरिकाना नाहक त्रास देत आहेत, अधिकारी वर्ग फक्त पाहणी करून जात आहेत , तथापि प्रत्यक्ष कामास दुर्लक्ष करणे ही बाब अतिशय गंभीर व खेदजनक आहे. अधिकारी जबाबदारी पासून दूर पळत आहे. एकमेकवर ढकला ढकली चे काम करीत आहेत, फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. श्रीजी लोंस ते वासुपुज्यस्वामी जैन मंदिर येथिल रस्ता करण्याबाबत खात्याकडून टाळाटाळ होत आहे. अद्याप ही काम करून घेण्याबाबत कोणतही पावले उचलली गेली नाहीत, ही बाब अतिशय गंभीर आहे. नागरिक अनावश्यक भरडला जात आहे, तरी त्वरित विनाविलंब कार्यवाही करण्यात यावी. असे जैन यांनी म्हटले आहे.