Aurangabad High Court | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी 26 सप्टेंबर ला

HomeBreaking Newsपुणे

Aurangabad High Court | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी 26 सप्टेंबर ला

Ganesh Kumar Mule Sep 18, 2023 2:30 AM

Aurangabad High Court | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी काल होऊ शकली नाही | लवकरच नवीन तारीख मिळणार
Pune Municipal Corporation | सफाई कामगारांच्या वारसांना पुणे महापालिकेचा दिलासा! | वारसा हक्काने नियुक्ती देण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी आता 20 मार्च  ला

Aurangabad High Court | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी 26 सप्टेंबर ला

| संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली वकिलांची भेट

 

Aurangabad High Court |  घाणकाम भत्ता वारसा हक्क (Ghanbhatta Allowance) अबाधित राहिलाच पाहिजे” या मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर (Aurangabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणी वेळी  पुढील सुनावणी 21 ऑगस्ट ला होईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ही सुनावणी आता 26 सप्टेंबर 2023 रोजी होईल असे जाहीर केले आहे. (Aurangabad High Court)
  घाणकाम भत्ता वारसा अधिकार कायम रहावा. या मागणीकरता महाराष्ट्र सरकारने ठाम व परीणामकारक भूमिका घ्यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची स्थगिती उठवावी व घाणीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती अजूनही मोठ्या प्रमाणात झालेली नाही.  याची दखल शासन दरबारी असलेल्या प्रतिनिधींनी घ्यावी व यावरची स्थगिती तात्काळ उठवावी. अशी मुख्य मागणी आहे. दरम्यान घाणभत्ता वारस केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर प्रलंबित आहे.
26 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:30 वाजता घाणभत्ता वारस हक्क संबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
त्याकरिता महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न एक्टू,पुणे महानगरपालिका कामगार युनियन  (मान्यताप्राप्त), अहमदनगर महानगर पालिका कामगार युनियन वतीने कॉ. उदय भट, कॉ. आनंदराव वायकर, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे यांनी औरंगाबाद येथे ॲड.आविष्कार शेळके यांची भेट घेतली.
या भेटीत खंडपीठासमोर जोरदार मांडणी करून हा प्रश्न सकारात्मक निर्णायक पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
—-