Ashok Vidyalaya Junior College | अशोक विद्यालय जुनियर कॉलेज आणि आबनावे कला महाविद्यालयाचा स्वागत समारंभ जल्लोषात संपन्न  | विनम्रता हा आयुष्यातला महत्त्वपूर्ण दागिना -सिद्धार्थ भांगे

HomePune

Ashok Vidyalaya Junior College | अशोक विद्यालय जुनियर कॉलेज आणि आबनावे कला महाविद्यालयाचा स्वागत समारंभ जल्लोषात संपन्न | विनम्रता हा आयुष्यातला महत्त्वपूर्ण दागिना -सिद्धार्थ भांगे

Ganesh Kumar Mule Sep 02, 2024 6:14 PM

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी
PM Modi Pune Sabha | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! | बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप
Service-Duty-Sacrifice Week : शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता : मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

Ashok Vidyalaya Junior College | अशोक विद्यालय जुनियर कॉलेज आणि आबनावे कला महाविद्यालयाचा स्वागत समारंभ जल्लोषात संपन्न

| विनम्रता हा आयुष्यातला महत्त्वपूर्ण दागिना -सिद्धार्थ भांगे

| कठीण परिश्रम आणि संघर्षातूनच यशस्वी विद्यार्थी घडतो -प्रवीण कोरघंटीवार

 

Maharashtra Vidyarthi Sahayak Mandal – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित अशोक विद्यालयकनिष्ठ महाविद्यालय आणि कै सि धो अबनावे कला महाविद्यालयाचा स्वागत सोहळा एस एम जोशी सभागृह येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे वयाच्या 22 व्या वर्षी आयपीएस झालेले तरुण सिद्धार्थ भांगे महाराष्ट्रात प्रथम आलेले जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे मन अध्यक्ष मोहन दादा जोशी, महाराष्ट्र सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, संचालक दिलीप आबनावे, पुष्कर आबनावे , गौरव आबनावे, तात्या सोनवणे उपस्थित होते.

यावेळी स्वागत समारंभामध्ये विद्यार्थ्यांची संवाद साधताना सिद्धार्थ बांगे यांनी आपली स्वप्न ध्येय ठरवून घेऊन ते पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे आयुष्यात विनम्रता कधीच विसरू नका विनम्रता ही तुमचा अलंकार असे उद्गार काढले शिक्षक यआपणावेयावेळी प्रवीण कोरडेंटीवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यातील खडतर प्रवास केलेली मेहनत विद्यार्थ्यांना सांगितली तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी मार्गदर्शन केले.

संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःमधील आत्मिक ऊर्जा जागृत करेल आणि त्याला प्रश्नांची आणि समस्येची जाणीव होईल त्यावेळी तो खरी प्रगती करेल ,त्याचबरोबर त्यांनी नामस्मरणाद्वारे ध्यानाचा मंत्र सांगितला. संस्थेचे खजिनदार प्रथमेश आबनावे यांनी विद्यार्थ्यांना संयम त्याचबरोबर संघर्ष ,नियोजन याचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना हा खडतर प्रवास करताना त्यांचे आरोग्य जपण्याचाही सल्ला दिला

यावेळी हेमंत ढवळे सर, सीमा गाडेकर यांनी संस्थेला विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी ,संस्थेच्या विकासासाठी आर्थिक योगदान दिले.

यावेळी अशोक विद्यालयाच्या प्राचार्या सौ युके भोसले कला महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ कल्याणी साळुंखे जुनिअर कॉलेजच्या रेखा दराडे ,मनीषा मोलवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गौरी पास्ते यांनी केले. प्रास्ताविक सौ वंदना अनारसे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ रोहिणी हुल्ले आणि विभा आबनावे यांनी केली. आभार  कीर्ती पेशवे यांनी मांडले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0