Arvind Shinde | PMC Encroachment Action | अरविंद शिंदे यांचा महापालिकेच्या बांधकाम विभागाला दणका

HomeपुणेBreaking News

Arvind Shinde | PMC Encroachment Action | अरविंद शिंदे यांचा महापालिकेच्या बांधकाम विभागाला दणका

कारभारी वृत्तसेवा Dec 29, 2023 2:17 PM

Rahul Gandhi | Pune congress | राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने 
Rahul Gandhi Congress | जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली | अरविंद शिंदे
Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Arvind Shinde | PMC Encroachment Action | अरविंद शिंदे यांचा महापालिकेच्या बांधकाम विभागाला दणका

| आंबेगाव बुद्रुक मध्ये करावी लागली कारवाई

 

Arvind Shinde | PMC Encroachment Action | पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी  महापालिकेच्या बांधकाम विभागाला (PMC Building Devlopment Department) चांगलाच दणका दिला आहे. आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk Pune) परिसरात शिंदे यांच्या तक्रारीनुसार अखेर अनधिकृत इमारतीवर प्रशासनाला कारवाई करावी लागली आहे. महापालिका बांधकाम विभागाकडून ११ इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

अनधिकृत इमारतींना बांधकाम विभागाकडून नोटीसा बजावून राजरोस भ्रष्टाचार सुरू असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुराव्यासह आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आंबेगाव येथील कारवाई करावी लागल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान कनिष्ठ अभियंता कोळेकर व भावसार यांच्या काळातील नोटिसीं चा काळाबाजार अरविंद शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केल्याने मनपा बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काळात अरविंद शिंदे यांनी बांधकाम विभाग बाबत मोठा खुलासा करणार असल्याचे सूचित केले आहे. (PMC Pune News)