Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

HomeBreaking Newsपुणे

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

Ganesh Kumar Mule Sep 10, 2023 9:14 AM

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’
Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!
BBC | Congress | केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

 

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble |  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Pune) भारतीय जनता पक्षाचे (BJP) बहुमत आहे. या भाजपच्या संचालकांनी नुकताच मार्केटयार्डमध्ये मासे, चिकन, मटण विक्रीसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला, आता या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आ. सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble) आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. भाजपच्या या दुटप्पीवागण्याचा, ढोंगीपणाचा करावा तेवढा निषेध कमी असल्याची भूमिका पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली.

    शिंदे पुढे म्हणाले,  १८ पैकी १३ सदस्य बाजार समितीत भाजपाचे आहेत. या संचालकांनी घेतलेल्या निर्णयाला भाजपाचेच आमदार विरोध करतात यामध्ये कांहीतरी काळंबेरं नक्की आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैन बांधव राहतात. त्यांच्या श्रद्धा, भावनांशी खेळून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याची शंका यामुळे येत आहे. बहुमताच्या बळावर हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादायचा आणि त्या निर्णयाविरोधात भूमिका घेवून जैन आणि वारकरी समुदायाची सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून होतोय. याचा तिव्र निषेध पुणे शहर जिल्हा काँग्रेस कडून करण्यात येतं आहे.

      लोकनेते अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून मोठया कष्टाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन करून मार्केटयार्ड इथे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी मालाच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले. यामध्ये जैन व्यापारी बांधवांचे योगदान ही मोठे आहे.

      आज मासे चिकन मटण विक्रीला परवानगी देतं आहेत उद्या दारू विक्रीला सुद्धा परवानगी मिळेल अशी शंका  आमच्या मनात निर्माण होतं आहे. यां सगळ्या गोष्टीला आत्ताच रोखले गेले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 

      मार्केटयार्डात चिकन, मटण, मासे विक्रीस आमचा विरोध आहे. यां निर्णया विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणारं आहे. 

      मार्केटयार्डात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी उत्पादनं खरेदी विक्री झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. असे शिंदे म्हणाले. 

—-

News Title | Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble MLA Misal, Kamble’s movement is a gimmick Arvind Shinde’s allegation