अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्भार
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्भार माजी अध्यक्ष रमेश बागवे यांच्या कडून अरविंद शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला.
शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरिय नवसंकल्प शिबीरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या झालेल्या ठरावानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त संघटनेतील असलेल्या पदांचा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व रोहित टिळक या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला प्रभारी अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक अरविंद शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
आज काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पद्भार स्विकारण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘माझ्या सारख्या मातंग समाजातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्ष पद दिले हे माझ्यासाठी आमदार, मंत्री पदापेक्षा मोठे होते. अध्यक्ष असताना शहरातील निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून व पदाधिकारी व नगरसेवकांना विचारात घेवून पक्षाचे काम गेली ६ वर्ष मी प्रामाणिकपणे केले.’’
नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिली. पक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आज अध्यक्ष पदाच्या रूपाने मला मिळाले. यामागे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, एच. के. पाटील, मा.ना.बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, मा.ना.अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मा.ना.सुनिल केदार, संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या सहकार्याने आगामी पुणे महानगरपालिकेच्या
निवडणुकीत पूर्ण ताकदीने व काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम मी करेन. त्याचबरोबर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय महानगरपालिकेत व शहरामध्ये होणार नाही. या पध्दतीचे काम शहरामध्ये पक्ष संघटना म्हणून मी करेन.’’
यावेळी माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी राज्यस्तरीय नवसंकल्प शिबीरामध्ये झालेल्या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, अमीर शेख, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, दत्ता बहिरट, कैलास कदम, संगीता तिवारी, रमेश अय्यर, पुजा आनंद, राहुल शिरसाट, भुषण रानभरे, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, सतीश पवार, प्रविण करपे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, सुनील घाडगे, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, रजनी त्रिभुवन, सुनिल शिंदे, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, शिवाजी बांगर, अस्लम बागवान, मुख्तार शेख, संदीप मोकाटे, राहुल तायडे, सुजित यादव, मेहबुब नदाफ, राजू शेख, दिपक निनारिया, मीरा शिंदे, दिपक ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, दत्ता पोळ, गौरव बोराडे, लतेंद्र भिंगारे, नंदलाल धिवार, शैलजा खेडेकर, सुंदर ओव्हाळ, सुरेश कांबळे, बबलु कोळी, योगेश भोकरे, अंजली सोलापूरे, शिलार रतनगिरी, अजित ढोकळे, किशोर मारणे, संतोष आरडे आदी उपस्थित होते.
COMMENTS