पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय?
| आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न
पुणे | पुणे महापालिकेतील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या साडे आठ हजारापेक्षा खरंच जास्त आहे का, असा प्रश्न भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना पडला आहे. त्यामुळे याबाबतचा तपशील त्यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागितला. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने सर्व विभागाकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे.
आमदार मिसाळ यांच्या प्रश्नानुसार सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करताल काय :-
(१) पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, पाणी पुरवठा, पथ, मोटार वाहन, सुरक्षा विभाग, विद्युत, मंडई, सांस्कृतिक केंद्र, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, अग्निशामक दल अशा एकूण २८ विभागातील कामे
करण्यासाठी साडेआठ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार नियुक्त केले आहेत, हे खरे आहे काय?
(२) असल्यास, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगार व ठेकेदारांचा सर्वसाधारण तपशील काय आहे?
(३) असल्यास, कंत्राटी कामगारांच्या वेतन देणेकामी पुणे महानगरपालिकेकडून एकूण किती खर्च करण्यात येत आहे, याचा तपशिल देण्यात यावा.

यानुसार महापालिका प्रशासनाने सर्व खात्याकडून कर्मचाऱ्यांची संख्या, संबंधित ठेकेदाराचे नाव आणि त्यावर झालेला खर्च याची माहिती मागवली आहे.