विकास कामांच्या नोंदी GIS प्रणालीत आहेत कि नाही? यावर अतिरिक्त आयुक्तांचे आहे लक्ष
| खात्यांकडून मागवला अहवाल
पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी करणेकरिता टेंडर युटीलिटी इंटरप्राईज जी.आय.एस प्रणालीच्या माध्यमातून विकसित करणेत आलेली आहे. जेणेकरून पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील विकास कामांमध्ये प्रशासकीय निर्णय घेताना गती येणार असून त्याबाबतची भौगोलिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्राप्त होणार असल्याने प्रशासकीय निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
तदनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी सर्व संबंधित विभागांनी/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी GIS प्रणालीच्या Base Map Layers वर करून घ्यावयाच्या असून सर्व संबंधित विभागप्रमुख/खातेप्रमुखांनी याची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत महापालिका आयुक्त यांचेमार्फत संदर्भाकित अन्वये आदेश देण्यात आले होते. तथापि विकास कामांच्या नोंदी GIS प्रणालीमध्
नसल्याचे निदर्शनास येत होते. १४/०१/२०२१ च्या कार्यालयीन
परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका अंदाजपत्रकीय सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षातील “स” यादीसह पूर्ण झालेली कामांची नोंद सर्व संबंधित विभागांनी/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी GIS प्रणालीच्या Base Map Layers वर करून ,सदर GIS नोंदी पूर्ण झाल्या बाबतचा अहवालाची पडताळणी मा माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत करून,GIS नोंदीबाबत संपूर्ण अहवाल सादर करण्यात यावेत. तसेच यापुढेही करण्यात येणाऱ्या कामांच्या नोंदी GIS प्रणालीच्
मॅपवर करण्यात याव्यात.तरी सर्व संबंधित विभाग/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते.