जिल्हा विद्युत नियंत्रण समितीवर रमेश अय्यर यांची नियुक्ती
पुणे : काँग्रेस पक्षाचे शहराचे सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर यांची पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या संमतीने रमेश अय्यर यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
रमेश अय्यर गेली ३८ वर्ष काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. पक्षाचे भवानी ब्लॉकचे सरचिटणीस, शहर काँग्रेसचे ग्राहक संरक्षणचे अध्यक्ष, शहर चिटणीस, प्रचार यंत्रणा सदस्य आदी पदांवर जबाबदारी सांभाळली असून गेली दहा वर्ष पक्षाचे सरचिटणीस आणि शहर प्रवक्ते म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत. पक्षाच्या ग्राहक सेलचेही काम त्यांनी पाहिले होते. ग्राहकांच्या हितासाठी त्यांनी न्यायालयीन लढाईसुद्धा केली आहे आणि ग्राहाकांना न्याय मिळवून दिला. सामाजिक कामाची आवड असणाऱ्या रमेश अय्यर यांचा विविध धार्मिक, शैक्षणिक संस्थांशी संबंध आहे.
विद्युत नियंत्रण समितीवर काम करताना प्रशासन आणि ग्राहक यांच्यातील समन्वय वाढविण्याचा प्रयत्न करेन, असे रमेश अय्यर यांनी सांगितले. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या शिफारशीने नियुक्ती झाल्याबद्दल अय्यर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अय्यर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS