Pradhan Mantri National Child Award | प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

HomeBreaking Newssocial

Pradhan Mantri National Child Award | प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

Ganesh Kumar Mule Sep 13, 2023 4:03 PM

Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”
Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम
PMPML | Discounted annual pass | पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

Pradhan Mantri National Child Award | प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

 

Pradhan Mantri National Child Award | नवी दिल्ली | प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (Pradhan Mantri National Child Award) 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालय (Women and Child Devlopment Ministry) दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्रदान करत असते.

या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीव्दारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. 26 डिसेंबर 2023 रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. मा. राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.