पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता वार्षिक, सहामाही व त्रैमासिक पासची सुविधा
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता सध्या रुपये ७५०/- चा मासिक पास वितरित करण्यात येत आहे. यामध्ये पासेसचा विद्यार्थांनी शैक्षणिक धोरणाकरिता जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने ७ जुलै पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रुपये ५,०००/-, सहामाही पास रुपये ३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- पासेस वितरित सुरू करण्यात येत आहे.
यापूर्वी रुपये ७५०/- च्या पास वितरणाची जी कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे तीच कार्यपद्धती नव्याने सुरू करण्यात येणार्या पासेस करता कार्यान्वित राहील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासबाबतची संपूर्ण माहिती परिवहन महामंडळाच्या पास केंद्रांवर मिळेल.
वरील प्रमाणे नव्याने सुरू करण्यात आलेले सवलतीचे विद्यार्थी वार्षिक पास रुपये ५०००/- हा परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बी.आर.टी. बिल्डिंग मुख्यालय क्र.१ च्या शेजारील पास विभाग येथे मिळेल. सहामाही पास रुपये
३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- हे दिनांक ०७/०७/२०२२ पासून परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून वितरित करण्यात येतील. तरी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.