Amol Balwadkar | अमोल बालवडकर मित्र परिवाराचा प्रभाग क्र. ९ मध्ये स्नेहमेळावा उत्साहात
| तरुण, स्वच्छ व विकासाभिमुख उमेदवाराला जनविश्वासाची ठोस पावती
PMC Election – (The Karbhari News Service) – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ९ (सुस-बाणेर-पाषाण) मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्याने या प्रभागातील निवडणूक हालचालींना स्पष्ट दिशा मिळाली आहे. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर रविवारी झालेल्या या स्नेहमेळाव्याला सुस, बाणेर, पाषाण, बालेवाडी, म्हाळुंगे, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या भागातील जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिकांनी उपस्थिती लावत बालवडकरांच्या पाठीशी असल्याचे एकमुखाने सांगितले. (Amol Balwadkar BJP)
अमोल बालवडकर यांच्या झंझावाती, विकासाभिमुख नेतृत्वामुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मित्र परिवाराने व्यक्त केला. भाजपा कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व महिला पदाधिकारी, सर्व आघाडीचे सदस्य, कार्यकर्ते, सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरीक, परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी थेट संवाद साधत आपुलकीची नाती दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. बालवडकर यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक तसेच युवकांसाठी रोजगार आणि क्रीडासुविधा या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.

प्रभाग क्रमांक नऊचा सर्वांगीण विकास हाच माझा प्राधान्यक्रम असून, नागरिकांच्या विश्वासावर आणि सहभागावर विकासाची वाटचाल होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच युवकांसाठी सातत्याने उपक्रम राबविले आहेत. भविष्यात माझ्या हातून आणखी चांगले व्हावे, यासाठी प्रभागातील स्नेहीजन मला संधी देतील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बालवडकर यांच्या २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यापीठ भाग कार्यवाहक संजय वाघुळदे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, नगरसेविका रोहिणी चिमटे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहु बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाशतात्या किसन बालवडकर, भाजपा नेते सुहास भोते, प्रियंका चिव्हे, मा. सरपंच नामदेव गोलांडे, मा. उपसरपंच काळुराम गायकवाड, युवा नेते अनिल ससार, ऍड. शिवाजीराव जांभुळकर, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर आदी उपस्थित होते.

COMMENTS