कंत्राटी कामगारांची इशारा सभा
| राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन
कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे
पुणे महानगरपालिका मध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार सध्या कार्यरत आहेत. मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात सुरक्षा रक्षक,वाहन चालक, पाणी पुरवठा, स्मशान भूमी,सफाई कामगार तसेच कार्यालयात लेखनिक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. या दिवाळीला मनपाच्या कायम कामगारांना ८.३३ टक्के बोनस म्हणजेच एक पगार व १९००० रूपये सानुग्रह अनुदान इतकी रक्कम मिळणार आहे.परंतू कंत्राटी कामगारांना काहीच मिळणार नाही हा मोठा अन्याय कंत्राटी कामगारांवर होत आहे.अशा सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच बोनस व सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील , कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच पगार द्यावा अशा मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे, त्यासाठी जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री सीताराम चव्हाण आणि सेक्रेटरी श्री. एस. के. पळसे यांनी केले आहे