पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची शिवभेट
: राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांची माहिती
पुणे : शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या 103 सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत वाढ देण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे. पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची शिवभेट आहे. अशी माहिती राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांनी दिली.
नितीन कदम म्हणाले, नगरसेविका अश्विनी कदम व पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांच्या विकास मंडळाच्या प्रयत्नांना यश येऊन आज शासनाने तीन वर्षाची मुदतवाढ देण्याचा शासननिर्णय जारी केला. आज पासून पुढील तीन वर्षे पानशेत पुरग्रस्त सोसायट्यांना प्रस्ताव दाखल करण्याची संधी मिळणार आहे.
या निर्णयाने आता पानशेत पूरग्रस्त 103 सोसायटीतील नागरिकांची घरे भाडेपट्ट्याने न राहता मालकी हक्काने होणार आहे. त्यानिमित्त सर्वांचे अभिनंदन व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार देखील कदम यांनी मानले आहेत.
COMMENTS