Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार

HomeपुणेBreaking News

Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार

Ganesh Kumar Mule Jun 02, 2023 4:47 PM

NCP Pune | कार्यकर्त्यांना बळ देणारा ‘राष्ट्रवादी’
Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार
Sharad Pawar | अजित पवार यांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? या प्रश्नांवर शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार

|राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज शिल्पाचे अनावरण

Ajit Pawar | जाती-धर्माचे राजकारण न करता अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी करावी हे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit pawar) यांनी व्यक्त केले. (Ajit Pawar)

कळस येथे वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांच्या स्थानिक आमदार निधीतून (MLA fund)साकारण्यात आलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून पायाभरणी केल्यामुळेच आज समाजातील सर्व धर्मातील लोक हे गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यामुळे युवा पिढीनेदेखील अशा महान थोर पुरुषांचे स्मरण करून ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्यावर लोकांनी अन्याय केला असला तरी पण त्यांच्या अभंगातूनच आज समाजाला प्रेरणा मिळत आहे.महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करून स्वराज्याचा झेंडा उंचावण्याचे काम छत्रपतींनी केले आहे. (Ajit pawar News)


याबरोबरच समाजाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात लढा देऊन विद्येच्या माहेरघरात मुलींकरिता शाळा खुली करण्यात आली. अशा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीपणी केली जाते, अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसरकारकडे करण्यात आली आहे. महान थोर पुरुषांनी महाराष्ट्राला जे चांगले विचार दिले आहेत, ते महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही.त्यामुळे समाजातील युवा पिढीने एक दिलाने एक विचाराने महाथोर पुरुषांचे विचार युवा पिढीने पुढे नेण्याचे काम करावे असे आवाहन अजीत पवार यांनी केले. (MlA Sunil Tingre)

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राजेंद्र खांदवे, शीतल सावंत, अहमद शेख, अजय सावंत, राजेंद्र खांदवे, अशोक खांदवे, सुहास टिंगरे, उषा कळमकर, नाना नलावडे, शशिकांत टिंगरे, माउली कळमकर, बंटी म्हस्के, प्रकाश म्हस्के, बंडू खांदवे, अशोक खांदवे, रवि टिंगरे, सतीश धापटे, सायबू चव्हाण आदी उपस्थित होते.


News Title | Ajit Pawar Do not bring caste-religion politics Ajit Pawar|Unveiling of Chhatrapati Sambhaji Maharaj sculpture by state opposition leaders